जूनमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद !
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक बँकिंग कामे ऑनलाईन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बहुतेक बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू आहेत. सामाजिक अंतर लक्षात घेऊन बँका आपल्या ग्राहकांना डोअर स्टेप बँकिंग सुविधा वापरण्याचा सल्ला देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ओसरत असली तरी अद्याप परिस्थिती कठीण आहे. अशा परिस्थितीत जूनमध्ये बँका किती दिवस उघडतील आणि बँका कधी बंद होतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपण जूनमध्ये बँका कधी बंद होतील, याबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत. 1 जून रोजी मंगळवार आहे, तेव्हा बँका खुल्या राहतील. रविवारी 6 जून रोजी बँका बंद राहतील. त्यानंतर 12 आणि 13 जून रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. तसेच रविवारी 20 जून रोजी बँका बंद राहणार आहेत. जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यात 26 आणि 27 रोजी (चौथा शनिवार आणि रविवारी) बँका बंद राहणार आहेत.

या दिवशी असेल सुट्टी
बँक बाजारच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 14 जून रोजी ओडिशा आणि पंजाबमधील गुरु अर्जुन देव जी शहीद दिनाच्या दिवशी बँका बंद राहणार आहे. 15 जून रोजी राजा संक्रांती आणि YMA Day मुळे ओडिशा आणि मिझोरममध्ये बँका बंद राहतील. चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये संत गुरु कबीर जयंतीमुळे 24 जून रोजी बँका बंद राहतील. 30 जून रोजी मिझोरममधील बँका रेमनानीमुळे बंद राहणार आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा