मुंबईत रेड अलर्ट जारी




मुंबई : मुंबईत मान्सूनने हजेरी लावली आहे. मान्सूने मुंबईत जोरदार धुमाकूळ घातली असून मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे, मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा