नगरपालिकेने मान्सून पूर्व नाल्या सफाई करून कचरा दररोज उचला – सुरेखा जाधव




बीड ।

बीड नगरपालिकेला विकास इंडिया पार्टी च्या सुरेखा जाधव, (बीड जिल्हा संघटक)यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड नगरपालिकेने मान्सून पूर्व नाल्या सफाई करून कचरा दररोज उचला पाहिजे. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आता पाऊस सुरू झाला आहे. नाला सफाई करायला पाहिजे. पण अजून नाल्या सफाई केलेल्या नाहीत. नाल्या तुंबल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे.तसेच बीड शहरात सर्वत्र कचरा पडलेला असतो. तो कचरा 8-8, ते 15-15 दिवस उचलल्या जात नाही. यामुळे घाणीचा दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छ शहर, स्वच्छ भारत या योजना च्या घंटा गाड्या कुठे फिरत आहेत. काही कळत नाही. जर बीड नगरपालिकेने 15 दिवसात नाल्या साफसफाई करून कचरा दररोज उचला नाही.तर विकास इंडिया पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष भागवत वैद्य, मनोज हम्प्रस (मराठवाडा उपाध्यक्ष) बीड जिल्हा संघटक सुरेखा जाधव , हे मुख्याधिकारी यांच्या दालनात नाल्यातील घाण आणि कचरा टाकणार आहोत. असा इशारा विकास इंडिया पार्टी चे भागवत वैद्य, मनोज हम्प्रस, सुरेखा जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा