पुजा मुंडेचे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अधुरेच.!




परळी वैजनाथ ।

दि.१२ शहरातील मोंढा भागात राहणाऱ्या ॲड. पुजा वसंत मुंडे (वय २५) यांचा विजेचा शॉक लागून गुरुवारी (ता.१०) दुर्देवी मृत्यू झाला. परिक्षा पास होऊनही कोरोनामुळे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे. येथील मुख्य बाजारपेठेत वास्तव्यास असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांची मुलगी. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच सुमारास शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी घरातील वरच्या मजल्यावरील रुमचे दरवाजे उघडे असल्यामुळे रुममध्ये पावसाचे पाणी साचलेले होते, पुजा हा दरवाजा बंद करण्यासाठी रुममध्ये जाताच विजेच्या बोर्डातून रुममध्ये करंट उतरलेला असल्याने शॉकचा धक्का बसून पुजाचे निधन झाले.

ॲड .पुजा मुंडे हीचे एल एल बी. एल. एल. एम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. एल.एल. एम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. यामध्ये विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच २०२० मध्ये न्यायाधीशची परीक्षाही पास झाली. या निकालात मुलींमधून राज्यात दुसरी, तर सर्वसाधारण मध्ये राज्यात १० वा क्रमांक पटकावला होता. एल.एल.बी मध्ये ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून दुसरा क्रमांक पटकावला होता.
न्यायाधीशांची परिक्षा पास होऊनही कोरोनाकाळ असल्याने शासनाकडून रुजू होण्यासाठी ऑर्डर आलेली नव्हती. म्हणून पुजा वर्षे भरापासून घरीच होती. न्यायाधीश म्हणून काम करण्याचे पुजाचे स्वप्न या अपघाती निधनामुळे अपुरे राहिले. पुजावर शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजता येथील सार्वजनिक समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ असा परिवार आहे. काँग्रेसचे जेष्ट नेते वसंत मुंडे यांची ती मुलगी होत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा