पत्नीचा खुन करून पतीचीही आत्महत्या !
नायगाव : शेतातील कामाच्या कारणावरून पती पत्नीत वाद  विकोपाला गेल्याने पत्नीस तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून पतीने दुसर्‍याच्या शेतात जाऊन झाडाला फाशी घेतल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान नरंगल ता नायगाव येथे घडली. या घटनेचे वृत्त गावात व तालुक्यात कळताच सर्वत्र खळबळ उडाली असून, मुलाने फिर्याद दिल्यावरून नायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील नरंगल येथील रहिवासी मोकिंदा भुजग पटेकर व त्याची पत्नी सकाळी गावा लगतच्या असलेल्या जनावरांच्या गोठ्याकडे दुध काढण्याच्या निमित्ताने गेले. त्यांच्यात शेतातील कामाचे कारणावरून पती पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत पत्नी रेनुकाबाई  मोकिंदा पटेकर वय 50 वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला. ते पाहून पती मोकिंदा याने दुसर्‍याच्या शेतात जाऊन सकाळी साडे सहाच्या सुमारास गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनी नरंगल येथे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन्ही प्रेत नायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करून नातेवाईकाला सुपूर्द केली. नरंगल येथे पती पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताचा मुलगा शिवाजी मोकिंदा पटेकर  यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ हे करीत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा