वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांचे अंबाजोगाई नगरपरिषद व उपजिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन




अंबाजोगाई ।   वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबाजोगाई शहरातील नागरिकांची कोविड 19 च्या कालावधीतील घरपट्टी व नळपट्टी माफ करणे बाबद निवेदन देण्यात आले. तसेच सफाई कर्मचारी सुदामती वाघमारे यांचे कोविड- 19 आजाराने नगर परिषदेत कर्तव्य बजावत असताना निधन झाले या संदर्भात उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई व मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन दिले.
नगर परिषद अंबाजोगाई मधील जनता कोविड-१९ मुळे आर्थिक संकटात सापडलेली आहे. आशा काळात नगर परिषद अंबाजोगाईने ठराव घेऊन अंबाजोगाई शहरातील नागरिकांची घरपट्टी व नळपट्टी मार्च २०२० ते अद्यापपर्यंतची माफ करून अंबानगरीतील जनतेस उपकृत करावे. सफाई कामगार सुदामती वाघमारे यांना मागच्या 4/05/2021 रोजी कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावल्या. त्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी होत्या, त्या कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. नगर परिषद या सुदामती वाघमारे यांच्या मृत्युची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. ते टाळाटाळ करत आहेत. व या ज्या नगर परिषद सफाई कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही सेवा सुविधा नगर परीषद देत नाही. नगर परिषद प्रशासन यांना विनंती करूनही नगरपरिषद प्रशासनच्या चुकीमुळेच सुदामती वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे.            सफाई कंत्राटदार कंपनी चे लेखी पत्राद्वारे म्हणणे आहे की सदरील सफाई कामगार महिला सौ सुदामती भगवान वाघमारे या,कंत्राटदार कंपनीच्या कर्मचारी नसून महिलांचे टेंडर अथवा महिला सफाई कामगार या कंत्राटदार कंपनीच्या करारपत्र मध्ये येत नाहीत.त्यामुळे इथे सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिका ची आहे कारण त्या नगरपालिका कर्मचारी होत्या, त्यामुळेच याचे दोषी असणाऱ्या च्या विरोधात आज निवेदनात वंचित बहुजन आघाडीने दोषी नगरपरिषद अध्यक्ष, मुख्याधिकारी, स्वच्छता विभागप्रमुख, व कंत्राटदार कंपनी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली आहे. वेळेस वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते प्रकाशजी वेदपाठक सर, सुशांत धावरे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, गोविंद मस्के तालुका प्रवक्ते, सतीश सोनवणे ता.प्रसिद्धी प्रमुख, उमेश शिंदे,ता,महासचिव, बालासाहेब मस्के, प्रा सुमित वाघमारे सर, सचिन भगवान वाघमारे, प्रवीण शिंदे सर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा