भागवतजी यांचा सन्मान !
सरस्वती जेव्हा लेखणी देते !
सकाळी बलभीम चौकात एक पुस्तक घेण्यासाठी गेलो तेव्हा गळ्यातले ओळखपत्र पाहून दुकानदार म्हटले , भागवत तावरे का , हो म्हणताच सर आत या, खुर्चीवर बसा म्हटले , मी नको म्हटलं म्हणून काऊंटर वर थांबलो , मग ते बोलू लागले , *तुम्ही भारी लिहता* , मी हसलो , त्यांनी पुस्तके व बिल घेऊन एक पेन समोर केला म्हटले सर हे माझ्याकडून , मी हरखून गेलो ,पार्कर आहे म्हणून नाही तर क्षणाची ओळख असताना कुणी का पेन द्यावा , माझ्या मनातल्या शंकेला त्यांनी खूप गोड उत्तर दिलं , ” सर राहू द्या ,तुम्ही आमच्या साठी लिहता ” माझा गैरसमज दूर झाला लेखक आणि वाचक ही ओळख क्षणाची नसते अनेक शब्द प्रवाह व विषयांतुन ती ओळख बनलेली असते , एक लेखक एक पत्रकार असाच ओळखीचा असतो अगदी आपला असतो , शरीराने समोर येण्याची कुठे गरज असते . तुम्हाला खर सांगू पेन दिला भेटला म्हणून पोस्ट अजिबात नाही , एक वाचकाने माझ्या बांधिलकीला दिलेला पुरस्कार म्हणून ही पोस्ट करत आहे . त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या लेखणी बद्दल असलेला विश्वास आपुलकी मी वाचली , किती किती सदगदित होऊन ते बोलत होते , एका लेखक पत्रकाराला यावर काय हवे असते , तुम्ही आमच्यासाठी लिहता ही मोहर आहे एक पुरस्कार आणि एक समाधान आहे . धन्य दिवसाची गोड सकाळ जेव्हा सरस्वती पेन देते .
– लोकपत्रकार

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा