जिल्हा आरोग्य विभागाला कमिशन खोरीची कीड! गंडाळ यांच्या हस्तकाने फरक बिलाचे मागितले 20 टक्के!

जिल्हा आरोग्य विभागात महिला वैद्यकीय अधिकाराच्या पतीचा गोंधळ !
बीड.
बीड जिल्हा आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी गंडाळ यांच्या हस्तकाला जिल्हा आरोग्य विभाग अंदन दिले आहे का? सातव्या वेतन आयोगाचे फरक बिल काढण्यासाठी चक्क हटवटे नावाचा कर्मचारी 20 टक्के रकमेची मागणी करत असल्याने जिल्हा आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराची व कमिशन खोरीची कीड लागली आहे का?
सातव्या वेतन आयोगाची फरक बिल काढण्यासाठी मागील दोन वर्षापासून जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या खेटे मारत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला चक्क कार्यालयातील कमिशनखोर सात लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी 20% कमिशनची मागणी करण्यात आली असल्याने जिल्हा आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या पती व बंधू कडून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. मागील दोन वर्षापासून कार्यालयात सतत अर्ज विनंती करूनही फक्त कमिशन साठी बिले रोखली असल्याचा आरोप नातेवाईकाकडून करण्यात आला असून, सातव्या वेतन आयोगाचे फरक बिल काढण्यासाठी चक्क 20% कमिशन मागणाऱ्या हटवटे नामक कर्मचारी व गंडाळ यांच्यावर कारवाई होईल का?
जिल्हा आरोग्य विभागात मागील अनेक दिवसापासून बिले काढण्यासाठी कमिशनची मागणी होत असल्याची चर्चा सुरू होती. डिसेंबर 2017 ला वैद्यकीय अधिकारी म्हणून बीड येथे एका महिला डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळाल्यानंतर नियमानुसार सातव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर सदरील वैद्यकीय अधिकारी यांना तब्बल पाच वर्षापासून सातव्या वेतन आयोगाचे फरक बिल सात लक्ष रुपये थकीत मिळाले नसल्याने मागील दोन वर्षापासून जिल्हा आरोग्य विभागात फरक बिल मिळावे यासाठी विनंती, अर्ज करूनही अधिकारी बिल काढण्यास टाळाटाळ करत होते. सदरील बिल काढण्यासाठी आपल्या हस्तकामार्फत 20% कमिशनची मागणी करण्यात आली. मात्र इमाने इतबारे काम केल्यानंतर कमिशन देण्याची वेळ त्या वैद्यकीय अधिकारी वर आल्याने संतप्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आरोग्य विभागात गोंधळ घातला. जिल्हा आरोग्य अधिकारी गंडाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांना फरक बिल काढण्यासाठी कमिशन द्यावे लागेल का अशी विचारणा करत धारेवर धरण्यात आले. बराच वेळ जिल्हा आरोग्य विभागात गोंधळ सुरू होता. कर्मचाऱ्याकडे समाधानकारक उत्तर नसल्याने अनेकांनी कार्यातून पळ काढला. जिल्हा आरोग्य अधिकारी गंडाळ यांनी पण कार्यालयातून निसटता पाय घेतला. हक्काच्या बिलासाठी जिल्हा आरोग्य विभागातील कमिशनखोर अधिकाऱ्यांना कमिशन देण्याची वेळ एका वैद्यकीय अधिकारी वर आल्याने वरिष्ठ याकडे लक्ष कधी देणार .असा प्रश्न उपस्थित होत असून हटवटे नावाचा कर्मचारी माजलगाव येथे कार्यरत असताना सतत बीड येथील मुख्य कार्यालयात कसा असाही प्रश्न उपस्थित केला जात असून याची चौकशी होणे आवश्यक बनली आहे.
कमिशन खोरीची कीड जडापासून नष्ट करण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? बीड जिल्हा आरोग्य विभागाला लागलेल्या कमिशनच्या हव्यास पोटी एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून फरक बिलासाठी ताटकळत ठेवण्यात आले असून फरक बिलासाठी जिल्हा आरोग्य विभागात नातेवाईकांनी घातलेला गोंधळ जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला. आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा