तरुण शेतकर्‍यांनी  रोपवाटीका उद्योगाकडे वळावे :आ. सुरेश धस




आष्टी : तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये मोठा बदल घडवून आला आहे. संशोधन केलेल्या वाणाची लागवड केल्यास  उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. यासाठी  निरोगी रोपांची आवश्यकता असते.   रोपवाटिका उद्योगा साठी  माती आणि पाण्याची आवश्यकता असते शेतकर्‍याकडे या सुविधा उपलब्ध असल्याने तरुण शेतकर्यांनी नव्याने रोपवाटिका उद्योगाकडे वळावे असे आ.सुरेश धस यांनी मंगरूळ येथील उद्योजक बंडू तोडकर व सरपंच खंडू तोडकर यांच्या भैरवनाथ हायटेक नर्सरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,सभापती बद्रीनाथ जगताप, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, रंगनाथ धोंडे, राजेंद्र दहातोंडे, गणेश शिंदे, सरपंच सुधीर पठाडे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, सरपंच अतुल कोठुळे, संपत शेळके, अमोल शिंदे, शरद देसाई, शफी सय्यद, नगरसेवक संतोष मुरकुटे, संतोष चव्हाण,अंकुश खोटे आदी उपस्थित होते.  हायटेक रोपवाटीकेंची गरज होती. याच बरोबर शेळीपालन करणार्या शेतकर्यांनी शेवरी लागवड करावी,समाजाला उपयोगी पडतील असे झाडे लावावेत.गुळवेल सारख्या आयुर्वेदिक वनस्पतीने कोरोना काळात खुप महत्त्वाचे काम केले आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर तर आभार सोमनाथ वाळके यांनी मानले.

लोकसहभागातून होणार 15 हजार रोपांची लागवड
रेणापूर : तालुक्यातील पोहरेगाव येथे लोकसहभागातून 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने त्यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल तसेच मान्यवरांच्या हस्ते या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.रोपांच्या लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या जागेची पाहणीही मान्यवरांनी केली.
लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे.त्यात वाढ करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलावा या हेतूने पोहरेगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच गंगासिंह कदम व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 60 गुंठे जागा निश्चित करण्यात आली असून या जागेत मियावाकी पद्धतीने 15 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी पोहरेगाव येथे येऊन वृक्षारोपणासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची पाहणी केली.ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेल्या या उपक्रमाची माहिती घेऊन पाठबळ दर्शवले.   याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव चेपट, पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे,गटविकास अधिकारी अभंगे,गोसावी, ग्रामविकास अधिकारी डी. आर.कांगणे,ग्रामपंचायत सदस्य विकास सरवदे, किशोर राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सरपंच गंगासिंह कदम यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. आगामी काही दिवसात वृक्षारोपण पूर्ण करून त्याचे संगोपन केले जाणार असल्याची माहिती सरपंच कदम यांनी या प्रसंगी मान्यवरांना दिली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा