AGM मध्ये शेअर होल्डर्सचा मोठा निर्णय; जेट एरवेज कंपनीला दणका




Marathwada patra Team

Jet Airways Latest News: एप्रिल2019 पासून सुरू असलेल्या जेट एअरवेज (Jet Airways)च्या रिवायवलबाबत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल NCLT चा निर्णय येत्या काळात अपेक्षित होता. पण कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (Jet Airways AGM 2021)भागधारकांच्या निर्णयामुळे जेट एअरवेजच्या रिझोल्यूशन प्रक्रियेला वेळ लागू शकतो. जेट एअरवेजच्या 28 व्या AGM मध्ये भागधारकांनी आर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2020 साठी ऑडिटेड फाइनेंशियल अकाउंट्सच्या‌‌‌‌ मंजुरीविरूद्ध वोट केले आहे.

अनिश्चित काळासाठी AGM स्थगितआर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2020 चे निकाल (Jet Airways financial results)भागधारकांकडे मंजुरीसाठी गेले,पण 95% शेएरहोल्डर्स यांनी दोन वर्षांच्या निकालांच्या मंजुरीच्या विरोधात मतदान केले. यामध्ये मोठ्या संख्येने इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर्सनी विरोधात मतदान केले. जेट एअरवेजच्या म्हणण्यानुसार,ठराव आवश्यक बहुमताने मंजूर झाला नाही,त्यामुळेच AGM अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आणि शेअरहोल्डर्सना नोटीस दिल्यानंतर स्थगितीबाबत बैठकीत विचार केला जाईल.

फाऊंडर नरेश गोयल आणि इतर प्रमोटर्स यांनीAGM मतदानात भाग घेतला नाही1995 मध्ये सुरू झालेली जेट एअरवेज एकेकाळी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. कंपनीचे फाउंडर नरेश गोयल (Naresh Goyal)यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादात होती. जेट एअरवेजच्या सुरुवातीच्या फंडिंग सोर्सवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते,युएईच्या एतिहाद एअरलाइन्स (Etihad Airlines)ने नोव्हेंबर 2013 मध्ये जेटमध्ये 24 टक्के स्टेक्स खरेदी केले होते,नरेश गोयल यांच्याकडे 51 टक्के पार्टनरशीप होती. कंपनीच्या अडचणी नोव्हेंबर2018 मध्ये चव्हाट्यावर आल्या जेव्हा कंपनीला3 वेळेस तिमाही निकालातल तोटा झाल्याचं जाहीर केले,इंडिपेंडेंट डायरेक्टर रंजन मथाई यांनी राजीनामा दिला.जेट एअरवेजला (Jet Airways )ला ईएमआय (EMI )ही भरता आला नाहीडिसेंबर2018 मध्ये, जेटने आपल्या वैमानिकांना एप्रिल 2019 पर्यंत थकबाकी देण्याचे आश्वासन दिले, पण पुढच्या महिन्यात जानेवारी 2019 मध्ये कंपनीला बँकांचा ईएमआय (EMI) सुद्धा भरता आला नाही. कंपनीच्या रेटिंगमध्ये पुन्हा घसरण झाली आणि 17 एप्रिल 2019 ला फंडच्या अडचणींमुळे कंपनीचे ऑपरेशन्स बंद झाले. वित्तीय वर्षात जेट एअरवेजला5539 कोटी आणि आर्थिक वर्षात2841 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा