आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त अनाथ बालकांना अन्नधान्य वाटप अनाथांच्या पाठिशी सदैव राहणार -प्रा सचिन उबाळे




बीड  l  स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठा आरक्षण चे झंझावाती नेतृत्व भाजपाचे आक्रमक आ.नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज बीड शहरापासून जवळच असलेल्या स्नेहसावली बालघर या ठिकाणी अनाथ मुलांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले . यावेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन भैय्या उबाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते . भाजपचे आक्रमक आ.नितेशजी राणे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात बीड जिल्ह्यात साजरा करण्यात येतो . परंतू कोविडमुळे विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला . बीड शहरापासून जवळच स्नेहसावली या ठिकाणी आ.नितेशजी राणे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात जाला . सर्वसामान्यांसाठी नेहमी तत्पर असणाया आमच्या नेत्याला उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी प्रा.सचिन भैया उबाळे यांनी आपल्या मनोगतात केली . या अनाथ बालकांना समाजातील प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू त्यांच्या पाठिशी आपण कायम राह अशी ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली . तसेच या ठिकाणच्या अनाथबालकांना अन्नधान्याचे वाटपही केली . यावेळी त्यांच्या सोबत मावळाचे संपादक सुनील यादव , पत्रकार संतोष कानडे ,  केशव कदम ,स्नेहसावलीचे संचालक निलेश मोहिते,स्वाभिमान चे भोला जाधव,नितीन डिसले, विकास वायभट, गणेश ढवळे, शेख वसीम,अभिजीत उबाळे, मयूर त्रिभुवन, विशाल गायकवाड, प्रसाद बागडे,सागर टेकाडे,योगेश गायकवाड, गणेश माने, सुहास विद्यागर,विक्की वाव्हळ,बालाजी शिंदे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा