ताळतंत्र नसलेल्या सरकारने आरक्षणाचा गुंता वाढवला- राजेंद्र मस्के





ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी भाजपा रस्त्यावर …

बीड ।

मराठा आरक्षणानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात राज्यातील आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले. धनगर आरक्षणा बाबतीतही या सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकारच्या भूमिकेमुळे समाजात प्रचंड तणाव निर्माण झाला. समाज उन्नतीसाठी आरक्षण हे महत्त्वाचे धोरण आहे. परंतु राज्य सरकार नीतीशून्य असून त्यांच्याकडे आरक्षणा बाबतीत कोणतेही ठोस धोरण नाही.  समाजाच्या हिताचे गांभीर्य नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने न्यायालयात आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार असमर्थ ठरले आहे.केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकू शकले नाही अशी टिका भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.

यामूळे राज्य सरकारच्या विरोधात तिव्र नाराजी निर्माण झाली. जनतेतील असंतोष  प्रकट करण्या साठी आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते.

बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व अॅड. सर्जेराव तात्या तांदळे व माजी आमदार केशव दादा आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.  बीड बसस्थानकासमोर दोन तास प्रचंड घोषणाबाजी करत हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी प्रमुख आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली.या आंदोलनात भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, नवनाथ शिराळे,प्रा.देविदास नागरगोजेराजेंद्र बांगर, जगदीश गुरखूदे, जयश्रीताई मुंडेविक्रांत हजारी, डॉ लक्ष्मण जाधव,अजय सवाईसलीम जहांगिर,चंद्रकांत फडसंतोष हंगेभगीरथ बियाणी, शांतिनाथ डोरले, विलास बामणेगणेश पुजारी, अनिल चांदणेहरीश खाडेभूषण पवारकिरण बांगरदत्ता परळकर, सुनील मिसाळसंग्राम बांगरफारुख भाईइर्शाद भाईविठ्ठल ठोकळअमोल वडतिलेअजय ढाकणेमीरा गांधलेशितल राजपूतसंध्या राजपूतसंगीता धसेछाया मिसाळ,अनिता जाधवशाम राऊतरवींद्र कळसाने,राकेश बिराजदार, दिपक थोरात, कपिल सौदा, अडु भाई आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

ओबीसी आरक्षण बचावासाठी विविध संघटनांचा पाठिंबा ..

भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनाला जिल्ह्यातील बारा बलुतेदार संघटना, माळी महासंघ,धनगर उन्नतीसंघ,नाभिक समाज संघटना,गुरव समाज संघटना,वंजारी सेवासंघ,चर्मकार महासंघ,मागासवर्गीय पदोन्नती बचाव समिती,सकल ओबीसी संघटना,बागवान समाज संघटना,आतार समाज संघटना,महाडगी जोशी समाज संघटना या संघटनांनी पाठींबा दिला ओबीसी समाजाचे सक्रीय कार्यकर्ते प्रा.लक्ष्मण गुंजाळ,प्रकाश कानगावकर,सरपंच पितळे,अशोक पांढरे संजय गुरव, सुतार संघटनेचे बापूराव भालेकर  यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदवून समर्थन दिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा