पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू




नेकनूर जवळील दगडवाडी शिवारातील घटना

नेकनूर – दि 30 (रामनाथ घोडके)

बीड l  तालुक्यातील नेकनूर जवळील दगडवाडी शिवारात विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या राधा किशोर लोखंडे वय ३० वर्ष राहणार दगडवाडी वस्ती नेकनुर या महिलेचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आसून आजूबाजूला कोणीच नसल्याने महिलेला वाचवण्यासाठी कोणीच आले नसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पीएस आय जाधव , पो कॉ सोनवणे , होमगार्ड कोरडे, डोईफोडे मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे

दोन दिवसांपासून शेतातील लाईट नसल्याने बीड तालुक्यातील दगडवाडी शिवारातील हनुमान मंदिराजवळील बाळू काळे यांच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी सदरील महिला गेली असतांना पाय घसरून विहिरीत पडली विहिरीत जास्त पाणी असल्याने आजू बाजूला कोणीच नसल्याने महिलेचा बुडून मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या महिलेला शवविच्छेदनासाठी नेकनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा