राष्ट्रसेवा म्हणून आठवड्यातून एकच रुग्ण मोफत तपासा -डॉक्टर वंजारे




  1. राष्ट्रसेवा म्हणून आठवड्यातून एकच रुग्ण मोफत तपासा -डॉक्टर जितीन वंजारे
    खलापुरी । मित्रानो देशसेवा फक्त सीमेवर जाऊनच होते असे नाही आपण आपल्या व्यावसायात राहून ही सेवा करू शकतो.आपण मनोभावे सेवा केली की त्यातूनही जनहित जपू शकते याच उदाहरणं सामाजिक कार्यकर्ते व संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर जितीनदादा वंजारे हे होय.त्यांनी कोरोना काळात सलग आठ दिवस मी मोफत सेवा दिली होती , मागच्या दुष्काळी परिस्थितीत पण बऱ्याच रुग्णांना मोफत सेवा दिली होती अधून मधून असे शिबीर मी घेत असतो यातूनही देशसेवा घडते असे मला वाटते.
    मित्रहो माझ्याकडे अशी अनेक रुग्ण येतात त्यांच्या सुख दुःखात मलाही सामावून घेतात जितके माझ्याच्यानी होईल ती मदत मग ती वैद्यकीय आर्थिक किंवा काही योजना बाबतीतली किंवा इतर समस्या असोत त्यापण मी माझ्या लेव्हल वरती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.अशेच एक रुग्ण हे आहेत विठ्ठलराव कैतके आमचे पेशंट.अस्सल गावरान धनगरी बाना असलेले हातात काठी ,डोक्यावर पटका ,पायात पायताण,धोतर , खमिस आणी माथी खंडोबा,बिरूबा आणी ज्योतिबा चा हळदी भंडारा असा अस्सल मराठमोळा धनगरी पेहराव,आज वय पंचाएंशी वर्ष पण व्यसन नसल्यामुळे आजही तब्बेत चांगली आहे .पहाडी पुरुष म्हणून परिसरात ओळख असणारे हे बाबा आल्यानंतर कधीच स्वतःचा त्रास सांगत नाहीत ते म्हणणार आता तुम्हीच पहा मला तपासून काय होतय ते ? मग आपण स्टेथो लावून लक्षणे सांगायची आणी त्यांनी हो किंवा नाही करायचं मग आपण कंप्लिट केस स्टडी झाली की उपचार द्यायचे .असे हे अप्रतिम बाबा आणी त्यांच गावठी मार्गदर्शन मला आवडते.माझ्याकडे अगदी विस्वासाने ते येतात आणी बरे होऊन जातात.अशी गोर गरीब अगदी साधी सिम्पल लोक माझ्याकडे येतात असेल ती रक्कम घेऊन कधीकधी ना नफा ना तोटा ,कधी फुकट कधी आपले पैसे घालून मी सेवा करत असतो.आणी माझ्यापरीने मी ती करत राहील*
    *खरं सांगू काही माणसाकडून पैसे मिळो न मिळो सेवा झाली तरी समाधान लाभते.कारण रुग्णांच्या कैफियती एकूण खरंच मनाला वाईट वाटते .कोण कोण कश्या कश्या परिस्थितीत असते हे जेंव्हा पेशंट एक आपुलकिने सांगतो तेंव्हा त्याच आणी आपल एक नातं तयार होत आणी ते टिकवन्याच एक वेगळीच कसब असतें जिच्यावर आमची प्रॅक्टिस अवलंबून असतें.नुसतं पैशापुरत विचार करत बसलो तर मानस कमवयाची राहून जातील आणी आयुष्यात माणसच नसतील तर तुमच जीवन व्यर्थ आहे.त्यामुळे अशी माणस जपली पाहिजेत असं मला वाटते.काही रुग्ण सेवा म्हणून मी मोफत तपासतो त्यांना मोफत औषधीउपचार देतो त्यात वेगळच समाधान लाभत.धन्यवाद ..मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर ,संचालक संजीवनी हॉस्पिटल आणी ट्रस्ट ,खालापूरी.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा