सुर्यकांत गुळभीले यांना राष्ट्रपती पदक




सुर्यकांत  गुळभीले यांना राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री , जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार।

दै. मराठवाडा पत्र टीम

दि. 14 ऑगस्ट 2021

बीड । : बीड पोलीस दलातील महिला व बालहक्क विभागात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांना यंदाचे राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे . यावर्षी बीड जिल्ह्यातील सुर्यकांत गुळभिले हे पदक पटकावणारे एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत . बीड जिल्ह्याची खडानखडा माहिती असणारे आणि कोणत्याही विभागाला न्याय देणारे सुर्यकांत गुळभिले 32 वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामगिरी फत्ते करणारा अधिकारी म्हणून यांच्याकडे पाहिले जाते . सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांना यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे . जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यासह बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेत यांनी काम केले आहे . अशक्यप्राय तपास लावणारा अधिकारी म्हणून गुळभिले यांची जिल्ह्यात ओळख आहे .यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे . यंदाचा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री , जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे .

गुळभीले यांच्यावर सर्वच स्तरांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा