दत्ता वाकसे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे चिंचवण ग्रामीण रुग्णालयाच्या मांडल्या व्यथा





 

वडवणी l तालुक्यातील चिंचवण ग्रामीण रुग्णालयाच्या विविध समस्या घेऊन राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश (भैय्या) टोपे यांची समर्थ सहकारी साखर कारखाना येथील रेस्टहाऊस येथे भेट घेऊन व्यथा मांडल्या यावेळी त्यांना धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांना निवेदन सादर केले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ उमेश करमाळकर, डॉ . यमपुरे, परिचारिका सुदामती मुंडे यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्या हे याठिकाणी गेल्या दहा-बारा वर्षांपासून कार्यरत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी असलेली स्त्री रोग तज्ञ डॉ यमपुरे, परिचारिका सुदामती मुंडे हे याठिकाणी ग्रामीण भागातून येत असलेल्या रुग्णांना उद्धटपणाची वागणूक देत आहेत वेळोवेळी आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे त्याचबरोबर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक गित्ते, यांच्याकडे देखील वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु त्यांनी कसल्याही प्रकारे या मागणीला गांभीर्याने न घेतल्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश (भैय्या) टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चिंचवण ग्रामीण रुग्णालयाच्या व्यथा मांडल्या त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सुसज्ज निवासस्थाने हे कर्मचाऱ्याला राहण्यासाठी बांधलेले आहेत परंतु या ठिकाणी असलेले कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात त्यामुळे या ठिकाणी असलेले रुग्ण हे त्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर चिंचवण ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत 30 ते 35 खेड्याचा जनसंपर्क येतो त्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक चांगला पद्धतीचा द्यावा त्याचबरोबर या ठिकाणी असलेले काही कर्मचारी हे डेप्युटेशनवर गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावे त्याचबरोबर एक्स-रे मशीन ही गेल्या सहा महिन्यापासून ग्रामीण रुग्णालय मध्ये येऊन धूळखात पडलेली आहे परंतु या ठिकाणीच्या मशीनला चालवण्यासाठी ऑपरेटरची जागा रिक्त असल्यामुळे बंद असते त्यामुळे या ठिकाणी तात्काळ चालक ऑपरेटर देण्यात यावा त्याचबरोबर याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची बिल्डिंग लोडबेरिंग असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिल्डींग गळत आहे त्यामुळे रुग्णाच्या जीविताला धोका होऊ शकतो तात्काळ या ठिकाणी नवीन बिल्डिंग उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयमध्ये 108 ॲम्बुलन्स देण्यात येते परंतुु याठिकाणी 108 ॲम्बुलन्स देण्यात यावी असे दत्ता वाकसे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे

108 ॲम्बुलन्सचा प्रश्न तत्काळ मार्गी लावणार

वडवणी तालुक्याच्या 108 ॲम्बुलन्ससाठी देखील याठिकाणी व्यथा मांडल्या तालुक्याला 108 ॲम्बुलन्स कार्यान्वित करावी यासाठी देखील त्या ठिकाणी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश भैय्या टोपे यांच्याकडे व्यथा मांडल्या या ठिकाणी त्यांनी तात्काळ 108 ॲम्बुलन्सचा प्रश्न मार्गी लावू असे देखील आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश भैय्या टोपे साहेब यांनी दिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा