वैद्यकीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र तर्फे युवा पत्रकार शेख जुनेद कोरणा महायोद्धा ने सन्मानित




वैद्यकीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र तर्फे युवा पत्रकार शेख जुनेद कोरणा महायोद्धा ने सन्मानित

गेवराई। तालुक्यातील नंदपुर येथील पत्रकार शेख जुनेद बंन्नुपटेल नेहेमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ती रस्त्यावर उतरणारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढा देणारे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे. जुनेद शेख
नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीशी नाळ जुळलेले युवा पत्रकार शेख जुनेद यांचा गेवराई येथे वैद्यकीय विद्यार्थी परिषद व पटेल फाउंडेशन च्या वतीने कोराना महायुद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मागील दोन वर्षे कोरोणा काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदतीचा हात दिला. अशा कठीण परिस्थितीत आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून. आपला जीव धोक्यात घालून आपण केवळ सामान्य नागरिकाच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे निभवल्या बद्दल. सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ साठी आपले बहुमोल योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल वैद्यकीय विद्यार्थी परिषद व पटेल फाउंडेशन बीड जिल्हा यांच्या वतीने मला पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या. दोन्ही संस्थांच्या वतीने मी पुढे असंच काम करत राहावं यासाठी मला त्यांनी पाठबळ दिलं. यावेळी वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण राडे सर, पटेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहेद पटेल, गेवराई तालुका अध्यक्ष मकसूद शेख, चकलांबा सर्कल प्रमुख मिनाज शेख, व या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर असलम शेख. व आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा