संवेदनशिल जनसेवक आमदार संदिपभैय्या क्षिरसागर




संवेदनशिल जनसेवक आमदार संदिपभैय्या क्षिरसागर

बीड । सध्याच्या राजकारणात संवेदनशिलता, मन,विचार, एकनिष्ठता, चळवळ, संघर्ष हे शब्दच लोप पावत आहेत. समाज बदलत चालला तसे नेत्यांचा कार्यकर्त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलत चालला आहे. समाजकारणातून वैचारिकबैठकितील,चळवळीतला नविन तयार झालेला कार्यकर्ता आता कोठे जास्त दिसत नाही. ताईट कपडे आणि डिलीटल बॅनर लावले की, तो कार्यकर्ता होतो ही आता सध्याची पध्दत झालेली आहे आणि यालाच सध्याच्या युगात राजकारण म्हटल जात. अशी मी केलेली व्यक्तिश: ती व्याख्या आहे. पक्ष आणि संघटना म्हटल की गाद्याय, संतरंज्या उचलणारे कार्यकर्ते, खळीचा डब्बा घेवून रात्रभर पोस्टर चिटकवणारे कार्यकर्ते, बेसन भाकरी खावून प्रचार करणारे कार्यकर्ते आता फार कमी झालेले आहेत. पण या सर्व गोष्टीची दखल घेऊन विचार करणारा नेता मला हवा होता आणि आज आमदार श्री.संदिपभैय्या क्षिरसागर यांच्या रुपाने मिळाला आहे.
समाजभावनेतून काम करत असलेल्या खऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारे नेते आमदार संदिप भैय्या आहेत. आजकाल नेते,लोक पण ज्यांच्याकडे पैसा आहे, जे आर्थिक म्हणजे साम,दाम,दंडावाले आहेत अशांनाच पुढे करतात हा माझा 22 वर्षाचा अनुभव आहे. कधी-कधी वाटायचे की राजकारण आपले क्षेत्रच नाही. कारण कदर करणारा नेता आपल्याला भेटणारच नाही. तशा अनेक घटना माझ्या बरोबर घडल्या होत्या आणि तो अनुभव मी करत असलेल्या कामाला,चळवळीलाही मागे घेवून जाणारा होता. उच्च शिक्षण सोडून देऊन समाजकारण केले. विद्यार्थीदशेपासून घरावर तुळशीपत्र ठेवून स्वत:ला राजकारणात झोकून दिले आणि मतदानाचा अधिकार आल्यापासून तब्बल वीस वर्ष ग्रामपंचायत ताब्यात ठेवली पण सरपंच तरी किती दिवस राहणार म्हणून मी नाळवंडी जि.प.सर्कलमध्ये शिवसेनेत असताना नेतृत्व केले पण पैसा सर्व काही नाही पण पैसा सुध्दा काहीतरी असतो तेव्हां मला जि.प.चे तिकीट दिले गेले नाही महणून समजलं. तद्नंतरच्या काळात संदिपभैय्याचा विचार मला माझ्या विचाराशी मिळता-जुळता वाटला आणि मी त्यांच्याकडे प्रवेश केला. पण तिथेही दोन वर्षाचा काळ अतिशय संघर्षमय गेला. तेंव्हा संदिपभैय्या बरोबर काम करण्याचा योग आला आणि जे मी आजतागायत संघर्षमय चळवळ केली. त्याचा पुरेपूर काम करण्याचा योग त्यांच्यासमवेत आला. आजचे आमदार संदिपभैय्या क्षिरसागर यांनी निवडणूक पूर्व जो मतदरसंघात जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बीड शहरात तर तब्बल जवळपास दोन महिने आम्ही पायी चालत बीड शहरातील गल्लो-गल्ली फिरलो सर्व बीड डोक्यावर घेतले मी तर म्हणेल आजतागायत बीड शहरात गल्ली-बोळात जाऊन प्रत्येक घर ना घर माहीत असलेला आमदार म्हणजे संदिपभैय्या आहेत. कार्यकर्त्याला पण त्यांनी कधीही मी नेता आणि तुम्ही कार्यकर्ते अशी वागणूक त्यांनी कधी दिली नाही. अनेक ठिकाणी शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील मी त्यांच्या बरोबर होतो कोठेही काही घात झाले अपघात झाले की, आमदार संदिपभैय्या तिथे हजर असणारच आणि ते आजही आमदार झाल्यानंतरही त्यांचे ते कर्तव्य निभावतात. काही ठिकाणी काहींची परिस्थिती पाहून ते खूप भावूक झालेले मी पाहिले आहेत म्हणूनच मी म्हणतो की, संवेदनशील नेता ते आहेतच कारण अनेक वेळा त्यांनी गोर-गरीब कुटूंबांना केलेली मदतीची जाहिरात कधी करु दिली नाही. मदत करताना त्याचा फोटो कधी काढून दिला नाही, हे राजकीय लोकात कोठे दिसत नाही. म्हणूनच देवापाशी न्याय आहे, त्यागाशिवाय कधी कोणाला काही मिळत नाही हे समीकरण जनताच ठरवत असते. गावोगावी असे अनेकवेळा झाले की, आ.संदिपभैय्यांनी ऐवढे काम केले आणि वर्तमानपत्रात का दिल नाही जाहीर का केलं नाही.तर आम्ही सांगायचो ते आमच्या नेत्याला आवडत नाही. आम्ही देखील म्हणायचो की राजकारणात ऐवढा सरळ-सरळपणा चालत नाही. पण संदिपभैय्या सांगत असत मदतीची जाहीरात करणं माझ्या बुद्धीला पटत नाही.आणि जनतेसमोर जाताना आपल्याला खोट बोलायचेच नाही. खोटा शब्द द्यायचा नाही.आहे असेच काम करत राहू आणि जिद्दीने जनसेवा करु हिच जनता जनार्धन-माय-बाप आपल्याला आशिर्वाद देणार आहेत.असे त्यांचे विचार असायचे. त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या जोरावर संदिपभैय्या आमदार झाले. आज आमदार झाले आहेत पण बीड विधानसभा मतदारसंघात दिलेले शब्द पूर्णत्वाकडे घेवून जाण्यासाठी रात्रदिवस ते काम करत आहेत. कसलाही आळस नाही, कंटाळा नाही. विकासाचा ध्यास घेवून ते मुंबई-दिल्ली वाऱ्या करत असतात. कसलाही सण नाही, ना कसलीही सुट्टी नाही. दिवस रात्र एक करत गेल्या तीस वर्षाचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी ते प्रत्येक कामाचा अभ्यास करत कामे रितसर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधानसभा निवडणूकापूर्व काही काळ खूपच प्रतिकूल परिस्थितीचा होता. राज्यात कधी काय घडत होते ते सांगता येत नव्हते. राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, आमदार ऐकमेकावर टोकाच्या कुरघोडया करत असताना आम्ही आमच्यासारखे अनेक कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हायचे आम्ही कधी-कधी संदिपभैय्यांना बोलून पण दाखवायचो पण चेहऱ्यावर हास्य आणि जबरदस्त इच्छा शक्ती, आणि खचा-खच भरलेला आत्मविश्वास हा संदिपभैय्यांचा सर्वोच्च गुण त्यांच्या कामी आला कोणी काहीही बोलले तरी मोठया आणि स्पष्ट शब्दात त्यांचे उत्तर असायचे काहीही होवो, पवार साहेबांना आपल्या सोडायचे नाही हा दृढ आत्मविश्वास सर्व कार्यकर्त्यांना नव संजिवनीच ते द्यायचे. खर तर मी लिहिण अतिशोक्ती होईल पण ऐवढया कमी वयात प्रतिकूल परिस्थिती असताना फार काळ राजकारणात असलेल्या मुरब्बी नेत्याला जे जमले नाही ते आमदार संदिपभैय्यांनी करुन दाखवले आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि अचूक वेद घ्यायची निर्णयक्षमता त्यांच्यामध्ये मला पाहिला मिळाली त्या सर्व घडामोडीचा साक्षीदार म्हणून मी जबाबदारीने हे लिहिण्याचा प्रपंच करत आहे. योग्य मार्गदर्शक नेते व निस्वार्थी तरुणांची फौज ही आमदार संदिपभैय्या क्षीरसागरांची संरक्षण भिंत आहे. जमेची बाजू दूसरी एक आहे की, संदिपभैय्यांनी कधी कुणाला असे जाणवून दिले नाही की मी नेता आणि कार्यकती सर्व आपण पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. असे म्हणून कधीही कोणाच्या स्वाभीमानाला त्यांनी ठेच लागून दिली नाही. कोणतीही यंत्रणा नव्हती पण कार्यकर्तेच यंत्रणा, कार्यकर्तेच नेते सर्व काही एकजीव होऊन आजही काम करत आहेत.
मनाचा मोठेपणा, दिलदार वृत्ती ही आमदार झाल्यानंतर देखील त्यांच्यात कसलाही बदल न होता, आजही पहायला मिळते. कोणीही कार्यकर्ता असो कोणावरही वेळप्रसंग आला तर धावून जाण्याची वृत्ती ती स्वभावात असते ती आजही त्यांच्यात कायम आहे. गेल्या काही दिवसातले माझ्या बरेाबरचे प्रसंग ते आमदार होण्याच्या अगोदर आणि आमदार झाल्यानंतर देखील मी अनुभवले आजारी असतांना ते जे जीव कार्यकर्त्याला लावतात अगदी सख्या भावाप्रमाणे नव्हे त्या”पेक्षा” म्हणलं तरी सुध्दा अतिशोक्ती ठरु नये. मी माझा प्रसंगावरुन सांगतो कार्यकर्ता किंवा भाटगिरी म्हणून मी लिहित नाही तर माझ्या जीवनातला सर्वांत वाईट प्रसंगी माझ्या बरोबर ते देवासारखे उभे राहिले म्हणून लिहिण्यास ते माझे कर्तव्य ठरते. कोणी किती कामे दिली, कोणी किती पौसा कमवून दिला हे राजकीय लोक पहात असतील पण माझ्या जीवन मरणाच्या क्षणाला भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले संदिपभैय्या काही औरच आहेत.ती दिलेली साथीचे पैशात मोजमाप होउच शकत नाही. यावेळी त्यांना उपमा देण्यासाठी मी नि:शब्द आहे.
आमदार संदिपभैय्या क्षिरसागर हे एक हरहुन्नरी असणारे नेते आहेत. सरळ-सरळ स्पष्ट बोणारे आहेत. रागही आला तरी स्पष्ट बोलून दाखवतील आणि चुकत असेल तर त्यांना सांभाळून घेवून योग्य मार्ग दाखवतील. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप काम केलेले आहे याची जाणीव ते सतत बाळगून असतात.
जेष्ठांची मर्जी ठेवून मान, सन्मान देऊन कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम ते करतात. आयुष्यात संघर्ष कसा करावा व त्याला सामोरे कसे जावे ही अनुभवाची शिदोरी त्यांचे वडील रविंद्रदादा क्षिरसागर यांच्याकडे आहेच. सांप्रदायिक असणार्‍या आईसाहेब रेखाताई यांचे आशिर्वाद आणि पत्नी नेहाताईची व दोन भाऊ उपनगराध्यक्ष हेमंतभैय्या व अर्जूनसेठ यांची खंबीर साथ, अथांग असणारा मित्र परिवार व जिवलग नेते, कार्यकर्त्यांचे पाठबळ ही आमदार संदिपभैय्यांनी कमावलेली खरी संपत्ती त्यांच्याकडे आहे. असे जनतेचे एकनिष्ठ सेवक असणार्‍या आमदार संदिपभैय्यांना उदंड आयुष्य लाभो, हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..!

भाऊसाहेब डावकर

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा