कल्याण मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या सेवागड निवासस्थानी सदिच्छा भेट




ओबीसी कल्याण मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या सेवागड निवासस्थानी सदिच्छा भेट

गेवराई l

संघर्षशिल लोकनेते तसेच ओबीसी व्हिजेएनटी कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवारहे सध्या राज्यभर दौरे काढून बहुजन समाजाचे संघटन करीत आहेत.समाजाचे सामाजिक शैक्षणिक अर्थिक प्रश्नां सोबतच स्थगिती मिळालेलं ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्या संदर्भात ओबीसींच्या सर्व संघटना सोबत विचार विमर्श करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. पी.टी.चव्हाण यांच्या गेवराई शहरातिल सेवालाल नगर भागात असलेल्या सेवागड निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि सविस्तर चर्चा केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी व्हिजेएनटीं आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यासाठी ना.विजय वडेट्टीवार यांचा बीड दौरा होता.मेळावा संपन्न झाल्यानंतर बीड शहरातील ओबीसींच्या अनेक कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटले कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.कार्यकर्त्यांना सुखा दुःखात भक्कम साथ देणारे नेते म्हणून ना. वडेट्टीवार यांची ओळख आहे.अशा भेटीगाठी मुळे ओबीसी जोडो अभियान राबविण्यात येत असल्याचे दिसून येते.
ना.विजय वडेट्टीवार यांचे प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या सेवागड निवासस्थानी शाल श्रीफळ फेटा व भव्य पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले..
चहापाणी नंतर राज्यातील बंजारा समाजाच्या प्रलंबित व जिव्हाळ्याचे प्रश्नांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा