ज्ञान विज्ञान आणि कौशल्य हेच आता खरे भांडवल- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर




ज्ञान विज्ञान आणि कौशल्य हेच आता खरे भांडवल- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड l
ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान याचबरोबर सिद्ध मेहनत आणि चिकाटी ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने यशाचे शिखर गाठायला हवी हेच आता यापुढे भांडवल असणार आहे ज्ञान संपादन करणे आणि त्यातून यशाचे शिखर गाठणे महत्त्वाचे ठरणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

जय संताजी प्रतिष्ठान आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ सोहळा काकू नाना सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी संत जगनाडे महाराज आणि स्व काकू नाना प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी हा भ प क्षीरसागर महाराज, राजेंद्र पवार, शंकरराव सरडे, रघुनाथराव राऊत, शंकर लोमटे, विजय दगडू पवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग क्षीरसागर यांनी केले, यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या पुढच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी यशाचे शिखर गाठणे म्हणून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव ही कौतुकाची बाब आहे ज्यांनी उत्तम गुण मिळवून प्राविण्य मिळवले आहे त्यांनाही शुभेच्छा दिल्या,ते म्हणाले की, माणसाचे श्रेष्ठत्व हे आता जातीवर नव्हे तर गुणवत्तेवर अवलंबून असणार आहे एकविसाव्या शतकाकडे जात असताना आपण प्रत्येक स्पर्धेत यश कसे मिळवता येईल याचा विचार केला पाहिजे त्यांना संपत्तीपेक्षा गुणांची संपत्ती महत्त्वाची ठरणार आहे ज्ञान संपादन करणे आणि त्यातून यशाचे शिखर गाठणे हेच आता मूळ भांडवल असणार आहे, मेहणत,लगन आणि जाणीव ठेवून प्रामाणिकपणे वाटचाल करायला हवी, कोरोणामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत या काळातही कल्पनेचे संपत्तीत रूपांतर कसे करता येते असे अनेक प्रयोग झाले आहेत ,अनेक कंपन्या अशा वेळी पुढे आल्या आहेत,ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत, कोरोना ओसरत असतानाच निसर्गाचा लहरीपणा सुरूच आहे, पर्यावरण बदलून गेले आहे अशा काळात संयम ठेवून पुढे जावे लागेल आजच संपूर्ण देशातील पदाधिकाऱ्यांची झुमद्वारे मिटींग झाली, त्या त्या राज्यात आपल्या समाजाला नेतृत्व मिळू शकते का? यावर विचार करण्यात आला,बीडमध्ये संत जगनाडे महाराज मंदिर व सभागृह उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे, लवकरच ते पूर्ण होत आहे, उत्साह इच्छाशक्ती असेल तर हवी ती आव्हाने पेलता येतील, आता जातीच्या नावावर काही चालवण्याचे दिवस गेले, अनेक कंपन्या उद्योग व्यवसायात उतरल्या आहेत समाजासाठी अनेक क्षेत्र खुली आहेत, मुलांना योग्य मार्गावर नेण्यासाठी पालकांनी तसेच संस्कार दिले पाहिजेत, मुलांचे शिक्षण चालू असताना आई-वडिलांच्या देखील अपेक्षा असतात, कसोटी असते मुलांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा,यावेळी प्रतिस्थानचे पदाधिकारी,समाज बांधव,महिला विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा