या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या




या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या!

संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजन करण्याचा दिवस असतो.

संकष्टी चतुर्थीची प्रत्येक गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतो. संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजन करण्याचा दिवस असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्यास दु:ख दूर होतात, अशी मान्यता आहे. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला म्हणजेच २२ डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी चंद्राचं पूजनाला विशेष महत्त्व आहे. मार्गशीष महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थीला २२ डिसेंबर बुधवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी सुरुवात होईल. तर २३ डिसेंबर गुरुवारी संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी समाप्ती असेल. चंद्रोदय २२ डिसेंबरला असल्याने संकष्टीचा उपवास २२ डिसेंबरला असेल. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी आहे. चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. यावेळी चंद्राला जल अर्पण करण्याचा विधी असतो.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा