छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या समाज कटकवर कठोर कारवाई करा – विद्यार्थी काँग्रेस बीड जिल्हा




छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या समाज कटकवर कठोर कारवाई करा – विद्यार्थी काँग्रेस बीड जिल्हा
बीड l
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने केंद्रात आणि कर्नाटक राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने बेंगलोर येथील झालेल्या शिवरायांच्या स्मारकाचे विटंबना प्रकरणी फक्त बघ्याची भूमिका घेत संबंधित आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केले आहे . बीड जिल्हा विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोमनी व भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे . विद्यार्थी काँग्रेसकडून देण्यात आले पत्रकात नमूद केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन जगात क्रांत्या झाल्या शिवरायांचे राज्य हे जगतवद्य म्हणजे जगाला वंदनीय असून छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जाती धर्मापुरते मर्यादित नसून लोककल्याणकारी जाणते राजे होते . परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीचे नेते शिवरायांना जातीवादी धर्मवादी करून मर्यादित करून पाहत आहे तर दुसरीकडे महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करून जातीय तेढ,धार्मिक दंगली घडवून पाहत आहेत या सर्व प्रकरणाचा निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयदीप राऊत व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शिवराज शिरसाट यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध करून योग्य ती कठोर कारवाई करण्याची विद्यार्थी काँग्रेस कडून मागणी केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा