झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ शाहिना अत्तरवाल यांची कहाणी




 

झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ शाहिना अत्तरवाल यांची कहाणी

जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आकाशाला गवसणी घालता येते. आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ असणाऱ्यांच्या वाटेत कितीही अडथळे आले, तरी ते पार करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करून आकाशाला गवसणी घालणारे फार कमी लोक असतात. मात्र त्यांच्या यशाचे गुणगाण सारं जग गातं. प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत यशाच्या आकाशात आकाशात गगनभरारी घेणाऱ्या शाहीना अत्तरवाला (Shaneena Attarwala) सध्या चर्चेत आहेत. मुंबईतील झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीमध्ये प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर (Product Design Manager) असा शाहीना यांचा प्रवास थक्क करणारा असाच आहे.

मुंबईतील (Mumbai) झोपडपट्टीत राहणाऱ्या शाहीना यांनी खूप मेहनत आणि चिकाटीने मायक्रोसॉफ्टसारख्या जगविख्यात कंपनीत नोकरी मिळवली आहे. नेटफ्लिक्सवरील (Netflix) ‘बॅड बॉय बिलीनीयर्सः इंडिया’ (Bad Boy Billionaires: India) या सिरीजमध्ये त्यांचं झोपडपट्टीतील घर दाखवल्यावर त्यांच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. शाहीना यांची पोस्ट ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाहीना अत्तरवाला (Shahina Attarwala) या मुंबईतील (Mumbai) बांद्रा रेल्वे स्टेशनच्या जवळील दर्गा गल्लीमधील एका झोपडपट्टीत राहत. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जीवावर आज त्या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर (Product Design Manager) पदापर्यंत पोहोचल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना मिळत नसत. स्वतःच्या मनाला मारून त्या संघर्ष करत होत्या. दर्गा गल्लीमध्ये सुविधांअभावी त्यांना रोडवरसुद्धा झोपावे लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळाल्यानंतर आता त्या संपुर्ण कुटूंबाची काळजी घेत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा