भय्यु महाराज आत्महत्या प्रकरणातील त्या आरोपींना शिक्षा ।




भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा ।

इंदोर । अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदौर न्यायालयाने शुक्रवारी महत्वपूर्ण निकाल दिला.

न्यायालयाने तिघांना दोषी धरत प्रत्येक सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक, शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक यांना दोषी धरण्यात आलं आहे.

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका दोषींवर ठेवण्यात आला. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते, असेही न्यायालयात सिध्द झाले. त्यामुळे आयपीसी कलम 306 नुसार तिघांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिघांना जानेवारी 2019 रोजी अटक करण्यात आले होते.

या प्रकरणात न्यायालयात 32 साक्षीदार सादर करण्यात आले. इंदौर येथील सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विनायकच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यूजींनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवली होती. संपत्ती नावाव केली नव्हती. त्यामुळे विनायकला फसवण्यात आले, असा दावा वकिलांनी केला. घटनेच्या काही दिवस आधी पुण्याला जात असताना भय्यूजींना सतत कुणाचेतरी फोन येत होते. पण त्याची चौकशी करण्यात आली नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केली.

तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. तिघे मिळून भय्यू महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा त्यांचा 16 वर्षांपासूनचा प्रामाणिक सेवक होता. आत्महत्येनंतर त्यांचे मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वादही समोर आला होता. पण त्यानंतर झालेल्या तपासात या तिघांची नावे समोर आली होती.

दरम्यान, पलक पुराणिकच्या (Palak Puranik) व्हॉट्सच्या चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. या चॅटमध्ये पियुष जिजू या आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्याच्याशी संवादात मांत्रिकाचाही उल्लेख आला आहे. महाराजांना अश्लील व्हिडीओच्या सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत पलक त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले होते. व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर केल्यानंतर त्यामध्ये भय्यू महाराजांसाठी बीएम हा कोड वापरण्यात आल्याचे समोर आले होते. पलक व पियुष जिजू या दोघांमध्ये झालेल्या संवादातून अनेक खुलासे झाले आहेत. त्यामुळे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाले होते. या संवादामध्ये मांत्रिकासोबत 25 लाखाचे डील झाल्याचा उल्लेख आहे.

भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीला मांत्रिक सापडला असून 25 लाखांची डील झाल्याची माहिती पलककडून पियुष देण्यात आली होती. बीएमला (भय्यू महाराज) वेडा करून घरी बसवलंय, असंही पलक त्याला सांगत आहे. कुहू घरी येणार असून उद्या तिची खोली ठीक होईल, असं पियुष पलकला सांगतो. त्यावर पलक म्हणते की, कुहूने शरद सांगितले, की मी समोर आले तर मारून टाकेल. ती तयारीने आल्याचे दिसतंय. आयुषीने पुन्हा काम बिघडवलंय. तिनं पुन्हा वहिनी, कुहू आणि बापूंचे फोटो जाळ्याचे पलक पियुषला सांगत आहे, असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात महाराजांचा सेवक विनायक व चालक शरद हा पलकला मदत करत असल्याचा आरोप होता.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा