वडवाडीत कामगारानेच टाकला सशस्त्र दरोडा!




वडवाडीत कामगारानेच टाकला सशस्त्र दरोडा !

नेकनर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब उघड, दोघांच्या बांधल्या मुसक्या l

बीड : वडवाडीत कामगारानेच टाकला सशस्त्र दरोडाङ्गबीड तालुक्यातील वडवाडी येथील बळीराजा कृषी विज्ञान केंद्रात कामगार असलेल्या एका कर्मचाऱ्याने दोन वर्षापूर्वी काम सोडले होते. त्याला या कृषी केंद्रातील आर्थिक व्यव्हाराचा परिपूर्ण आभ्यास होता. याचा फायदा घेवून त्याने काही साथिदाराला सोबत घेवून 4 ऑगस्ट रोजी सशस्त्र दरोडा टाकून सोन्या-चांदीसह लाखोंची रोकड लुटली होती. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याचा तपास लावत दोन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. या प्रकरणी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.ङ्गपोलिसांनी दत्ता रमेश शिंदे (वय 27 वर्षे) आणि आकाश बापू काळे (वय 22 वर्षे) दोघे रा. कोळवाडीवाडी महादेवनगर, ता. कळंब अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती अशी की, बीड तालुक्यातील वडवाडी येथे बळीराजा विज्ञान केंद्र आहे. या केंद्रात गेल्या काही दिवसांपूर्वी एक कामगार कामाला होता. येथील आर्थिक व्यवहाराबद्दल त्याला सर्व माहिती होती. त्याने काम सोडल्यानंतर आपण तेथे दरोडा टाकू शकतोत, असा प्लॅन त्याने केला आणि तेथे कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याला हाताशी धरले. बऱ्याच दिवस दरोडेखोरांनी कट रचल्यानंतर दि. 4 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे बळीराजा विज्ञान केंद्रात त्यांनी दरोडा टाकून अभिमान शाहूराव अवचार (वय 39) आणि त्यांची पत्नी यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कार्यालयातील रोख असा एकूण 10 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी नेकनूर पोलिसात दि. 4 ऑगस्ट रोजी अभिमान अवचर यांच्या फिर्यादीवरून कलम 395, 397 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत: यात लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवली. नेकनूर पोलिसांनी याचा तपास केला. तपास सुरू असताना बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वस्त्या पोलिसांनी तपासून काढल्या. या वेळी पोलिसांनी आपले खबरी नेमले होते. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना बळीराजा विज्ञान केंद्रात कामगार असलेल्या कर्मचाऱ्यानेच हा दरोडा टाकल्याचे समजले. पोलिसांनी त्या कामगाराच्या मुसक्या बांधत खाक्या दाखवताच त्याने आपण हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांना त्याने दिलेल्या माहितीनुसार काही वर्षापुर्वी काम सोडून गेला होता. मात्र त्याला येथील सर्व आर्थिक व्यवहार माहित होता त्यामुळे त्याने येथे दरोडा टाकण्याचा कट रचला. हा कट यशस्वी करण्यासाठी त्याने कार्यालयात कामाला असलेल्या एकाला गळाला लावले. हा दरोडा टाकण्यासाठी त्याला इतर साथीदारांची गरज असतानाच टोपणी पेढी, कळम तालुक्यातील काही साथीदारांनी त्याला मदत केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दत्ता रमेश शिंदे (वय 27), आकाश बापु काळे (वय 22) दोघे रा. कोठाळवाडी महादेवनगर ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दरोड्यातील मुख्य सुत्रधार आहेत तर बलभीम बाबू काळे (वय 32) आणि अनिल ऊर्फ राहुल अंकुश शिंदे (दो. रा. कोठाळवाडी, महादेवनगर ता. कळंब) या आरोपींनी दरोड्यात आकाश काळे आणि दत्ता शिंदे याला मदत केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, नेकनूरचे पीआय मुस्तफा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय संजय तुपे यांची उपस्थिती होती. ही धडाकेबाज कारवाई नेकनुर पोलिसांनी केली.

कट रचून दरोडा यशस्वी केला
यातील मुख्य आरोपी हा बळीराजा कृषी विज्ञान केंद्रात कामाला होता. गेल्या दोन वर्षापूर्वी त्याने काम सोडले होते. मात्र येथील आर्थिक व्यव्हाराची पूर्ण माहिती असल्याने त्याने येथे दरोडा टाकण्याचा कट रचला अन्‌‍ तो इतर साथीदारांच्या सहकाऱ्याने यशस्वीही केला.

सिसिटीव्ही फुटेजमुळे तपासाला मिळाली गती
दरोडेखोरांना येथील कृषी केंद्राची इत्यभूत माहिती होती. कॅश कोठे अन्‌‍ किती असते हे त्यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी दरोडा यशस्वी केला मात्र सिसिटीव्ही फुटेज अन्‌‍ खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिस मार्ग काढत गेले अन्‌‍ प्रि-प्लॅन दरोडा उघड केला.

गुन्हेगारी वस्त्या पिंजून काढल्या
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनुर पोलिसांनी योग्य तपास करत असतांना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वस्त्या पिंजून काढल्या. त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. त्यामुळे ही टोळी त्यांच्या हाती लागली. यातील दोन गुन्हेगारांवर बीड ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

Datta Narnale

शेअर करा