धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेताच जयसिंग सोळंकेनी डिलीट केली ‘ती’ पोस्ट!




धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेताच जयसिंग सोळंकेनी डिलीट केली ‘ती’ डिलीट

10 मिनिटातच बदलली छोट्या सोळंकेची डिलीट

माजलगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो डावलणे राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांना सोशल मीडियावर चांगलेच भोवले आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आवाहन केलेल्या जयसिंग सोळंके यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा फोटो टाळला होता, मात्र फेसबुकवर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी यावरून जयसिंग सोळंकेला चांगलेच खडे बोल सुनावले.

त्यानंतर दहा मिनिटातच जयसिंह सोळंके यांना ती पोस्ट डिलीट करावी लागली आहे. सोळंके घराण्यातील युवक नेतृत्व म्हणून नावारूपाला आलेल्या जयसिंह सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा रोष पाहून अवघ्या दहा मिनिटात ती पोस्ट डिलीट करून धनंजय मुंडे यांचा फोटो समाविष्ट करत नवीन पोस्ट फेसबुकवरून शेअर केली.

धनंजय मुंडे हे राज्यात नेतृत्व करतात, आजच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सोबत माढा मतदारसंघात दौऱ्यात होते. मात्र एका मतदारसंघापुरते मर्यादित असलेल्या सोळंके कुटुंबाला धनंजय मुंडे यांच्या फोटोची व त्यांच्यातील नेतृत्वाची अडचण होते का? असा खडा सवाल काही मुंडे समर्थकांनी जयसिंह यांना फेसबुक वरून विचारत, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आजवर माजलगाव मतदारसंघात गाजलेल्या सभा, झालेली कामे, उपभोगलेली पदे आदींची मुंडेंच्या समर्थकांनी आठवण करून दिली.

याआधीही काही कार्यक्रमांमधून धनंजय मुंडे यांचा फोटो जयसिंह सोळंके यांनी टाळल्याचे दिसल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांना सुनावले होते. तर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करतात, आक्रमक, अभ्यासू व लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या नेतृत्वाचा नेहमी फायदा घेणाऱ्या सोळंके यांना नेते म्हणून मुंडेंचा फोटो वापरणे, त्यांचे नाव घेणे, नेमकी याला काय अडचण असावी, अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली.

अजित पवारांच्या सभेत मुंडेंनी केले कौतुक अन प्रकाश दादांचा चेहराच पडला

दोनच दिवसांपूर्वी माजलगाव येथे सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहिरात बॅनर वर देखील धनंजय मुंडे यांचा फोटो नव्हता. मुंडे-सोळंके असा काही वाद सुरू आहे का, असाही प्रश्न त्यावेळी उपस्थित अनेकांना पडला होता; त्यात धनंजय मुंडे थेट मुख्य कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्यानंतर तिथे आले.

परंतु धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणातून आमदार प्रकाश सोळंके यांचे अतिशय मोठ्या मनाने तोंड भरून कौतुक केले, भाषणात त्यांचा मार्गदर्शक वगैरे उल्लेख करून, मुंडेंनी सोळंके यांच्या कारकिर्दीतील अनेक कामांना उजाळा देत त्या कामांचे श्रेय सोळंके यांना दिले. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या प्रकाश सोळंके व जयसिंह यांचा चेहरा मात्र खजील झालेला – पडलेला व पाहण्यासारखा दिसत होता!

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा