आप व जियो जिंदगी संयुक्त विद्यमाने अंजनवती येथिल नि:शुल्क आरोग्य सेवा- सपोनि लक्ष्मण केंद्रे 




आप व जियो जिंदगी संयुक्त विद्यमाने अंजनवती येथिल नि:शुल्क आरोग्य सेवा- सपोनि लक्ष्मण केंद्रे 
बीड ! आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे व जिओ जिंदगी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथिल दहा दिवसीय नि:शुल्क आरोग्य सेवेची नेकनुर पोलीस ठाण्याचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नागरीक श्रीरंग येडे, तर सुत्रसंचालन बाळासाहेब मोरे यांनी तर आभार प्रदर्शन नितिन सोनावणे यांनी केले ._____________________________
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे आणि जिओ जिंदगी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने बीड तालुक्यातील अंजनवती येथे दि.5 मे ते 15 मे दहा दिवसीय नि:शुल्क आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अंजनवती परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते, लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेले व उपचारासाठी लागणारा खर्च ऐकून भांबावलेले ग्रामस्थ दुखणे अंगावर काढत होते यातुनच परिस्थिती गंभीर झाली होती, त्यामुळेच माजी सैनिक अशोक येडे व जिओ जिंदगीचे भास्कर ढवळे गुरूजी यांच्या संकल्पनेतुन निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात दहा दिवस वैद्यकीय सेवा सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली. आज दि. 15 मे रोजी नेकनुर पोलीस ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली सुत्रसंचालन बाळासाहेब मोरे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बीड तर आभार प्रदर्शन नितिन सोनावने ऑल इंडिया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष यांनी केले.

जन्मभुमीतील ग्रामस्थांना महामारीत आधार देत आरोग्य सेवा केल्याचे समाधान:- अशोक येडे
____ जन्मभुमी अंजनवती गावात 8-10 मृत्यु कोरोनामुळे दगावल्यामुळे आधार व आरोग्य सेवा देण्याच्या हेतुने दहा दिवसीय नि:शुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांमधिल भिती कमी करून या कोरोनाच्या महामारीत मानसिक आधार व आरोग्य सेवा दिल्याचे समाधान जास्त या उपक्रमात सरपंच सुनिल येडे तसेच उपसरपंच दादाहारी येडे यांनी शिबिरासाठी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून दिले, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी वैद्यकीय सेवा दिली, डाॅ.खाकरे के.डी.वैद्यकीय आधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा यांनी गावात अन्टीजेन तपासणी घेतली, याकामी बाळासाहेब मोरे, तसेच नितिन सोनावणे व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचा ॠणी असून भविष्यात सुद्धा आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातील.

लाॅकडाऊन कालावधीत गावोगावी नि:शुल्क आरोग्य शिबिर भरवणे काळाची गरज:- डाॅ.गणेश ढवळे
लाॅकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना गरीब परिस्थितीमुळे दुखणे अंगावर काढण्याची वेळ आल्याने आजार बळावत जाऊन गंभीर परिस्थीती उद्भवते, माजी सैनिक अशोक येडे यांनी आयोजित केल्याप्रमाणे गावोगावी नि:शुल्क आरोग्य शिबिर भरवणे ,जनजागृती करणे, ग्रामस्थांमधिल आजाराविषयी जागृती करून भय दुर करणे आदि.काळाची गरज असून कोरोनाच्या महामारीत आरोग्य सेवा दिल्याने आत्मिक समाधान मिळाले. या वेळी अशोक येडे, बाळासाहेब मोरे, नितिन सोनावणे यांची खुप मदत झाली.

  • कौतुकास्पद उपक्रम, वृक्षसंवर्धन व संगोपण जनचळवळ व्हावी:-सपोनि लक्ष्मण केंद्रे
    ग्रामीण भागामध्ये जिथे दवाखाना, औषधी दुकान नाही अशा गावामध्ये नि:शुल्क आरोग्य शिबिर भरवणे त्यातुन तपासणी, औषधोपचार देणे, समाजामध्ये कोरोना आजाराविषयी जनजागृती करत विनामूल्य औषधोपचार करणे अत्यंत कौतुकास्पद उपक्रम असून आज ऑक्सिजनची कमतरता, ऑक्सिजन साठी मोजावे लागणारे पैसे याचा विचार करता निसर्गाने वृक्षाच्या रूपाने दिलेल्या ऑक्सिजनचे महत्व आपणा सर्वांच्याच लक्षात आले असेल त्यामुळेच भविष्यात वृक्षलागवड व वृक्षसंगोपण ही जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा