पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी चि.युवराज विशाल लाड याची निवड

Female Coach In Water Giving Group Of Children Swimming Lesson In Indoor Pool



पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी चि.युवराज विशाल लाड याची झाली

तलवाडा
औरंगाबाद विभागामध्ये विभागस्तरीय जलतरण स्पर्धा मध्ये 50 मी बॅकस्ट्रोक 100 मी बॅकस्ट्रोक आणि 200 मी बॅकस्ट्रोक या जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून समर्थ विद्यामंदिर तलवाडा येथील विद्यार्थी चि.युवराज विशाल लाड इयत्ता आठवी राहणार राहेरी याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
युवराज ला मार्गदर्शक म्हणून श्री अनिल शेळके कोच (बीड पोलीस) व
गणेश अर्जुन (मुंबई पोलीस) विशाल लाड, गोविंद लाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले म्हणून हे यश संपादन केले.या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष शर्मा सर, शर्मा मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पवार सर, व सर्व शिक्षक वृंद यांनी युवराज चे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा