पत्रकार अविनाश कदम यांना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहिर




पत्रकार अविनाश कदम यांना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहि

पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल ;अभिनेत्री निशिगंधा वाड,साहित्यिक दासू वैद्य, मा.आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते होणार आष्टी

आष्टी। प्रतिनिधी
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम हे मागील गेल्या १५ वर्ष पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक व गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम व न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकरी शिक्षण संस्था संचलित भगवान महाविद्यालय आष्टी येथे आयोजित ‘गंगाई बाबाजी महोत्सव’ समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येत असतात. या वर्षीचा २०२३ चा आदर्श पत्रकारिता पुरस्कार अविनाश कदम यांना जाहिर झाला असून लवकरच दि.२० जानेवारी रोजी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड, साहित्यिक दासू वैद्य, माजी.आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.

आष्टी येथील शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांच्या माता-पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ धार्मिक,सामाजिक, साहित्य,कला,क्रीडा,पञकारिता, कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यंदाचा पत्रकारितेचा पुरस्कार आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अविनाश कदम यांना जाहिर झाला असून ते मागील पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात असून राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक,कृषी, धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते मागील पंधरा वर्षापासून करत असून त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी आ. भिमराव धोंडे व संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी सांगितले. दि २० जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड, साहित्यिक दासू वैद्य, स्वागताध्यक्ष माजी आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते वितरण आष्टी येथे गंगाई बाबाजी महोत्सवात होणार आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आ सुरेश धस, आ बाळासाहेब आजबे, माजी आ साहेबराव दरेकर, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख,अनिल महाजन, संपादक सतीश बियाणी, लोकमतचे बीड जिल्हा प्रतिनिधी अनिल लगड, विशाल साळुंखे,अनिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जितेंद्र शिरसाट,विलास डोळसे, संपादक दत्तात्रय नरनाळे व सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा