रयत सामाजिक प्रतिष्ठान वतीने राजस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सौ सीमा ओस्तवाल सन्मानित




रयत सामाजिक प्रतिष्ठान वतीने राजस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सौ सीमा ओस्तवाल सन्मानित

बीड दि 3 (प्रतिनिधी) : सौ. सीमा ओस्तवाल यांना रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते राजस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात रविवारी ( दि 29 जानेवारी) मोठ्या थाटात संपन्न झाला.

रयत प्रतिष्ठान बीड च्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राजस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो .सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबदल सौ सीमा ओस्तवाल यांना 2023 चा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला होता . रविवारी 29 जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित कलाकार उत्कृष्ट दिग्दर्शक व अभिनेते व अभिनेत्री उपस्थित होते रयत प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सौ. सीमा ओस्तवाल यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेशजी साबळे सर, तुलसी कॉलेजचे अध्यक्ष प्रदीपजी रोडे, प्रशांत दादा होळशी( अध्यक्ष चित्रपट महामंडळ ) रविराज जाधव( कार्याध्यक्ष महाराष्ट्र चित्रपट महामंडळ ) जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभवजी स्वामी सर ,रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी माने ,आदर्श पोलखोल चे संपादक नितेशजी उपाध्ये तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सीमा ओस्तवाल ह्या मागील 12 वर्ष पासून सामाजिक क्षेत्रात उत्कृत कार्य करत आहे गरजू लोकांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम घेऊन सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत या साठी सौ सीमा ओस्तवाल याना राज्यस्थरीय समाजरत्न पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा