बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसागर




बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसाग

राष्ट्रवादीची कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक उत्साहात


बीड

दि.23- jully जिल्हाभरातील युवक कार्यकर्त्यांचा उत्साह, शेतकरी, जेष्ठ नागरिकांचा पवार साहेबांवरील विश्वास व माता-भगिणींची लक्षणीय प्रतिसाद. या सर्व गोष्टी बीड जिल्हा हा सदैव निष्ठेच्या पाठी आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत आहे. याचे प्रमाण आहे. आजच्या बैठकीतून आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. रविवार (दि.23) रोजी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.23) रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी आ.क्षीरसागर यांनी जिल्हाभरातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वैयक्तिक भेटी घेऊन संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत कषरणे, शेतकरी, कामगार, महिला, गोरगरीब, वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर आहे. आपण सर्व मिळून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यात मोठे यश मिळवून देऊ, आजपासून नव्हे आत्तापासूनच कामाला लागू असे सांगितले. या बैठकीस जयसिंग काका गायकवाड, सय्यद सलीम, महेबुब शेख, साहेबराव दरेकर नाना, उषाताई दराडे, पृथ्वीराज साठे, अ‍ॅड.डी.बी.बागल, डॉ.नरेंद्र काळे, मनोहर डाके, नारायणराव डक, राम खाडे, सुदामतीताई गुट्टे, गणेश कवडे, शिवभूषण जाधव, वैजीनाथ तांदळे, हांगे दादा, मदनराव जाधव, गंगाभिषण थावरे, हेमाताई पिंपळे, समद भाई, डॉ.सरवदे, श्रीराम मुंडे, रोहिदास निर्मळ, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन व बीड, शिरूर का., पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी, अंबाजोगाई, केज, परळी वै. जिल्हाभरातून व आकरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ.क्षीरसागर स्वतः करत होते नियोजन

कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक एकूण चार तास सुरू होती. यादरम्यान आ.संदीप क्षीरसागर केवळ 15 ते 20 मिनीटे खुर्चीवर बसले होते इतरवेळी त्यांचे आलेल्या लोकांचे नियोजन करणे व कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सतत चालू होते.

जोशपुर्ण कार्यकर्त्यांची उत्साहात उपस्थिती

बैठकीसाठी जिल्हाभरातील जोशपुर्ण कार्यकर्त्यांची उत्साहात उपस्थिती होती. पक्षवाढीसाठी व पक्षाकडून सोपवण्यात आलेली कामे आम्ही निष्ठेने पूर्ण करू असे येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा