जालना शहर काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी शेख इब्राहीम यांची नियुक्ती




जालना शहर काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी शेख इब्राहीम यांची नियुक्त

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते शेख इब्राहीम यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास बापु औताडे यांनी एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र देवून जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली आहे.
जालना शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी शेख इब्राहीम यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल जालना, जिल्ह्याचे प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार यांनी या संदर्भात शिफारस केली होती. शनिवार रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि औरंगाबाद – जालना लोकसभेचे पक्षाचे निरिक्षक माजी मंत्री आरेफ नसीम खान यांनी एका कार्यक्रमात श्री शेख यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. जालना महापालिका क्षेत्रात काँग्रेस सेवादलाचे भरीव काम करून देशाचे नेते खा. राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खा. मलिकाअर्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे हात मजबुत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचवून पक्ष संघटना बळकट करावी असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.
श्री शेख यांची जालना शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, राजेंद्र राख, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशोद्दीन, नंदाताई पवार, गणेश राऊत, वसंत जाधव, राहुल देशमुख, जावेद बेग, नारायण वाढेकर, माजी नगरसेवक अरूण मगरे, वैभव उगले, शेख शकील, विनोद रत्नपारखे, शेख वसिम, असीफ पठाण, अमोलराजे भोसले, दत्ता लहाने, किसन परळकर, प्रशांत, योगेश जाधव, अर्शद शेख, योगेश पाटील, अजीम बागवान, गणेश चांदोडे, जावेद अली आदींनी अभिनंदन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा