दिंद्रुडचा अजिंक्य ठोंबरे जिल्ह्यात सर्व प्रथम




दिंद्रुडचा अजिंक्य ठोंबरे जिल्ह्यात सर्व प्रथ

◾️व्यंकटेशचे पाचजण बुद्धिमत्ता चाचणीत चमकले

दिंद्रुड दि. 19 ( प्रतिनिधी) :- नुकत्याच बीड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत दिंद्रुड चा अजिंक्य अमोल ठोंबरे हा विद्यार्थी जिल्ह्यात सर्वप्रथम आला आहे. त्याचबरोबर येथील व्यंकटेश पब्लिक स्कूलचे आणखी चार विद्यार्थी या स्पर्धेत चमकले आहेत. परीक्षा कमिटीने चि.अजिंक्य यास सायकल बक्षीस देऊन त्याचा गौरव केला आहे.
याबाबत अधिकृत असे की, बीड येथील एसबीएसएस या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय गणित बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरात विविध केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात दिंद्रुड येथील व्यंकटेश पब्लिक स्कूल ने बाजी मारली आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी चि. अजिंक्य अमोल ठोंबरे हा जिल्ह्यातून सर्वप्रथम आला आहे. अजिंक्य यास प्रथम पारितोषिक म्हणून संस्थेच्या वतीने सायकल बक्षीस देण्यात आली आहे.
या स्पर्धेत व्यंकटेश पब्लिक स्कूलच्या आयुष्यमान विशाल सोळंके यां विद्यार्थ्यानेही घवघवीत यश संपादन केले आहे. तो माजलगाव तालुक्यात प्रथम आला आहे. तर याच शाळेची विद्यार्थिनी कु. गायत्री बाळासाहेब जाधव व सम्राट राम तोंडे हे दोघेही तालुक्यातून सर्व द्वितीय आले आहेत. तर कु. अक्षरा अर्जुन बडे ही तालुक्यात तृतीय आली आहे. विद्यामंदिर इंग्लिश स्कूलचे आनंद रमेश ठोंबरे व मल्हार भारत पांचाळ ते दोन विद्यार्थी सुद्धा अनुक्रमे तालुक्यात प्रथम व तृतीय आले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप ठोंबरे, बंडू खांडेकर, बळीराम पारेकर, सौ. स्वाती ठोंबरे, मुख्याध्यापक भीमराज मस्के व सर्व शिक्षक – शिक्षकांनी कौतुक केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा