सिओ अंधारे मॅडम बीड शहरातील अंधार व अस्वच्छता कधी दूर करणार – माजी सभापती नवनाथ शिराळे




सिओ अंधारे मॅडम बीड शहरातील अंधार व अस्वच्छता कधी दूर करणार – माजी सभापती नवनाथ शिराळे

बीड
बीड शहर व शहराच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शहरातील प्रत्येक वार्डामध्ये कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या नाल्याची दुर्गंधी पसरली आहे. शहरात धुळीचे लोट निर्माण झालेले प्रदूषण यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. श्वसनाचे आजार वाढले. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे साथीचे आजार घरोघरी पोहचले. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्याचा खर्च वाढला. अनेक पोलवरती दिवाबत्ती गुल झाल्याने, अनेक ठिकाणी अंधार आहे. मुलभूत गरजा नागरिकांना मिळणार नसतील तर, बीड नगरपालिकेचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित करत शहरातील अस्वच्छता आणि अंधार सिओ अंधारे मॅडम दूर करू शकत नसतील, तर त्यांनी स्वतःहून बीड नगर पालिकेतून कार्यमुक्त व्हावे. असे आवाहन भाजपा जिल्हा सचिव तथा नगरपरिषद माजी सभापती नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

बीड नगरपालिकेतील कारभारात प्रचंड गदारोळ असून, स्वच्छता, पाणी, लाईट, आरोग्य या अत्यावश्यक बाबींकडे नगरपालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. वर्तमान पत्रातून रोज वाभाडे निघत आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून, बीडकरांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष देऊन, जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे कर्तव्य विसरल्या. डास निर्मुलन फवारणी यंत्र स्वत : पुरते न वापरता, बीड करांच्या आरोग्यासाठी वापरा. धूळ साफसफाईची मशीन प्रामाणिकपणे शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरवली तर पन्नास टक्के कमी करता येईल. आणि मनावर घेतलेच तर, शहरातील नाल्या व कचऱ्याचे ढीग उपसण्याचे काम करून शहर स्वच्छ करता येईल. त्यासाठी कर्तव्य तत्परतेची इच्छा शक्ती व जनते विषयी संवेदना असणे आवश्यक आहे. कदाचित आपण गांभीर्य विचारातून संकल्प केला तर बीडकरांच्या नशिबी आलेली अस्वच्छता दूर होऊ शकते. असा आम्हाला ठाम विश्वास आहे. जनतेचे सेवक आणि शासनाचे सक्षम अधिकारी म्हणून आपण बीड शहराच्या कल्याणासाठी तातडीने पाउल उचलावे किंवा स्वइच्छेने बीड शहरातून कार्यमुक्त व्हावे. असेच आवाहन भाजपा जिल्हा सचिव तथा नगर परिषद माजी सभापती नवनाथ शिराळे पाटील यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा