जिजाऊ मल्टीस्टेट ठेव घोटाळा एसआयटी नेमण्यासाठी पुर्ण प्रयत्न करु..!- खा. प्रितमताई मुंडे




 

जिजाऊ मल्टीस्टेट ठेव घोटाळा एसआयटी नेमण्यासाठी पुर्ण प्रयत्न करु..!- खा. प्रितमताई मुंढे

उपमुख्यमंत्री फडणवीसांना एसआयटी साठी आग्रह धरणार –

बीड

बीड मधील जिजाऊ मल्टीस्टेट ठेव घोटाळा प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, सर्व आरोपींना अटक करण्यात यावी. आरोपीच्या मालमत्ता तपासणी जप्तीची कारवाई करण्यासाठी वरिष्ठ दर्जाचा प्रशासक नेमने हे महत्वाचे निर्णय घेऊन, शासन आणि प्रशासनाने ठोस कारवाई करून गोरगरीब ठेवीदारांचा पैसा परत मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय उच्च तपासणी पथक नेमण्याची गरज आहे. लवकरच राज्याचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात एसआयटी नेमण्याचा आग्रह धरून पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास बीड येथे खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी ठेवीदारांना दिला.
जिजाऊ मल्टीस्टेट ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या विनंतीला मान देऊन खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी समितीचे अध्यक्ष — आप्पासाहेब जगताप यांच्या निवासस्थानी ठेवीदारांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ठेवीदार संघर्ष समितीचे मार्गदर्शक अशोकराव हिंगे, अध्यक्ष अप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष डॉ. अरविंद काकडे, उपाध्यक्ष इंजि. मारुती वनवे, मारुतीराव तिपाले, शेख कुतुब, रवींद्र पालीमकर, प्रा. परसे, प्रा. सोंडगे, सौ. बांगर ताई, लक्ष्मण हाटवटे यांच्यासह ठेवीदार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये सुमारे 200 कोटी रुपयाचा घोटाळा असून गेली पाच महिन्यापासून आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांच्या द्वारा तपास चालू आहे. घोटाळ्याची सविस्तर माहिती अद्याप पोलीस तपासात पुढे आली नाही. मुख्य आरोपी बबन शिंदे, व्यवस्थापक अश्विनी वांढरे, हे फरार असून त्यांना अटक करण्यात पोलीस अयशस्वी ठरले. गोरगरिबांच्या ठेवीचा पैसा कोणी व कसा लुबाडला. ठेविदारांना त्यांचा पैसा मिळणार का.?
गृहमंत्र्यांनी विशेष तपासाचे आदेश देऊनही तपासाला योग्य दिशा का मिळत नाही. याबद्दल ठेवीदारांध्ये प्रचंड संभ्रम आहे. किमान तपास योग्य दिशेने चालू असल्याची माहिती अद्याप जनतेपुढे आली नाही. आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासाक नेमण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रस्तावित करणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाची कोणतीच हालचाल दिसत नाही. प्रशासना कडून ठेवीदारांना दिलासा मिळाला नाही. संघर्षकृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगताप व मार्गदर्शक अशोकराव हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा चालू असून या प्रकरणात एसआयटी नेमल्या शिवाय घोटाळ्याचा छडा लागणार नाही.
या आर्थिक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एस आय टी नेमलीच पाहिजे यासाठी समितीचे प्रयत्न चालू आहेत. सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर *ठेविदार बांधव *अन्नत्याग*
*आंदोलनाच्या तयारीत आहेत.*
न्याय हक्कासाठी काल खा. प्रीतमताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन एसआयटी नेमण्याची मागणी केली. जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा गंभीर असून, यामुळे हजारो कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रत्येक ठेवीदाराला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी एसआयटी नेमण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन एसआयटी नेमण्याचा आग्रह धरू.
असा विश्वास खा. ताईंनी दिल्यामुळे ठेवीदारांना धीर प्राप्त झाला. या बैठकीस भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, डॉ. अभय वनवे, सलीम जहांगीर, विक्रांत हजारी,गणेश पुजारी आदी उपस्थित होते

जिजाऊ मल्टीस्टेट ठेव रक्कम घोटाळ्याचा तपास गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे.
मुख्य आरोपी मोकाट आहेत. घोटाळ्या बाबत पोलीसांकडे कोणती माहिती उपलब्ध झाली. ठेवीदारांना पैसा मिळणार का. अशा अनेक प्रश्नांमुळे ठेवीदार चिंताग्रस्त आहे.
पोलिसांनी तपासाची माहिती पत्रकार परिषद घेवून जनतेला द्यावी. यामुळे ठेवीदारां मधील संभ्रम कमी होईल.
अशी अपेक्षा जिजाऊ मल्टीस्टेट कृती संघर्ष समितीचे मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक हिंगे यांनी व्यक्त केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा