मराठे पुणे जिल्ह्यात दाखल मुंबईत इतिहास घडणार मनोज जरांगे




मराठे पुणे जिल्ह्यात दाखल मुंबईत इतिहास घडणार मनोज जरांगे

मुस्लिम बांधवांनी मोठ्या थाटात केले स्वागत
मराठा आंदोलकांना बीड जिल्ह्यातील शेतकरी पुणे जिल्हा संपेपर्यंत मोफत दूध वाटप करणार
परमेश्वर शिंदे आंबेवाडी ता आष्टी शेतकरी

आदोलनातुन दादासाहेब जोगदंड

– गरजवंत मराठ्यांचा लढा घेवून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कुच केली आहे. कालरात्री उशिरा बाराबाभळी (जि. अहमदनगर) येथे त्यांची विराट सभा झाली. त्यानंतर आज दुपारी मराठा आरक्षण लढ्याच्या स्वारीने अहमदनगर काबीज केले असुन तिथेही लाखोंच्या गदर्दीत जरांगे पाटील आणि मावळ्यांचे स्वागत झाले. गावा-गावातून मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या पदयात्रेत सहभागी होत असुन प्रत्येक ठिकाणी ‘मराठा तितुका मेळवावा, मुंबईत इतिहास घडवावा’ अशी हाक मावळे देत आहेत. विशेष म्हणजे काल सायंकाळी बाराबाभळी येथील एका मदरशामध्ये मराठा आंदोलक मावळ्यांची ‘मेहमान नवाजी’ करण्यात आली. त्यांच्या सेवेसाठी तेथील ३५० विद्यार्थीही सज्ज होते. त्याच ठिकाणच्या मैदानावर जरांगे पाटालांची सभा झाली. एकीकडे काही नेत्यांच्या प्रक्षोभक विधानामुळे दोन जातीत तेढ वाढत आहे. एकमेकांविषयी द्वेष वाढवण्याचे काम होत आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम समाजाच्या या मदरशामुळे नक्कीच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होणार
आहे. एवढेच नव्हे तर धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींसाठी ही मेहमान नवाजी सणसणीत चपराक ठरली आहे.
रांजण गावं मध्ये मुक्काम करून
आजचे दुपारचे जेवण भिमा कोरेगाव रात्री चा मुक्काम चंदन नगर खराडी बायपास पुणे येथे होणार आहे

परमेश्वर शिदे आंबेवाडी ता आष्टी
या शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यात जाऊन दररोज सकाळी ताजे मशीचे दुध मराठा आदोलाकाला मोफत वाटप करत आहेत पुणे जिल्हा संपेपर्यंत मि दररोज सकाळी दुध वाटप करणार आसुन तुम्ही पुढं जा आम्ही मागे सगळं साबाळतोत आसं सांगीतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा