प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग यांचा रुजू करून घेण्याच्या आदेशाला संस्थाचालकाची केराची टोपली




संस्थाचालकाच्या विरोधात चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच l

बीड l  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा पाथरा ता. केज जी. बीड येथील संस्थाचालक लहू बनसोडे यांनी 8 मार्च 2019 रोजी संस्थेचा अनुदान संदर्भिय निर्णय झाल्या नंतर उपोषणकर्ते सात कर्मचारी यांना आतिरिक्त पैशाची मागणी करत शाळेवर येण्यास सक्त मज्जाव केला, त्या नंतर त्या कर्मचारी यांनी संबंधित सर्व आधिकारी, सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदने तक्रारी केल्या त्याच आणूशंगाने प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांनी सुनावणी घेऊन सर्व साक्षी पुरावे पाहून कर्मचारी यांच्या फेर नियुक्तीचे आदेश पारित केले ते आदेश येऊनही संस्थाचालक लहू बनसोडे हे सदरील कर्मचारी यांना रुजू करून घेण्यास बिलकुल तयार नाहीत मला तो आदेश मान्य नाही तो आदेश रद्द करा आशी मागणी करत देि.02-06-2021 सकाळी 10 वाजता कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर झाडावर चढून प्रादेशिक उपायुक्त जलील शेख सह.आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्या सह शासनास अतिशय अश्र्लिष शिवी गाळ करत झाडावर चढुन आंदोलन केले,

तर या आदेशाची अंमलबजावणी करा सदरील संस्था ही शासनाच्या ताब्यात घ्या या आनेक मागण्या सह अन्यायग्रस्त कर्मचारी शाळेच्या समोरच बसले आहेत उपोषणाला त्या संस्थाचालक यांचा विद्यार्थी कर्मचारी आणि पूर्ण गावाला देखील त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ या संस्थाचालक आणि संस्थेवर शासनाकडून कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा