प्रत्येकाने किमान पाच वृक्षाचे रोपन करुन वाढदिवस साजरा करावा




शंभर (पिंपळ वृक्ष ) बोधिवृक्ष लावून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा l

बीड l अनेक वाढदिवस दररोज साजरे होताना आपण पाहिले असतील त्यामध्ये बॅनर बाजी, अतिषबाजी, भोजनाच्या पंगती, केक कापणे, सोनेतुला, चांदीतुला पेढेतुला, ग्रंथतुला, साखरतुला, हजारो किलोचे क्रेनच्या सह्याने पुष्पहार घालून,ओल्या पार्टी,डि.जे नाचगाने, आशा स्वरुपाचे वाढदिवस मोठ्या थाटात साजरी केली जातात पाहिले, पण कोरोना रोगाच्या भिशन महामारी मध्ये प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह ॲडमिट रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे या गोष्टीचे दूरदृष्टीचा विचार करून बीडच्या मुख्य पोस्ट कार्यालयतील पोस्ट मास्तर, सामाजिक जाण व भान असलेले अमरसिंह ढाका यांनी एक नव्हे दोन नव्हे तर शंभर (पिंपळवृक्ष) बोधिवृक्ष विकत घेऊन,बीड शहरातील विद्युत भवन परिसर, जिल्हा सत्र न्यायालय परिसर, बीडचे मुख्य टपाल कार्यालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरा मध्ये वृक्षारोपण केले आहे.

शंभर (पिंपळ वृक्ष) बोधिवृक्ष हे खूप उपयोगी आहेत अशा अनोख्या पद्धतीच्या वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्याची कल्पना अमरसिंह ढाका यांनी काही‌ दिवासा पासून मनता होती. प्रत्यक्ष वाढदिवसा निमित्त ती कृतीत आणून त्यांनी आपन वृक्ष मित्र आहेत दाखवले. पुढे ते म्हणाले की चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आशा पद्धतीने वाढदिवस साजरे करायला पाहिजेत जेणेकरून निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी मदत होईल.

आपण ज्या गावा,परिसरात व समाजामध्ये वावरतो राहतो, ज्या निसर्गाचा जन्म झाल्या पासून ते मृत्यू पर्यंत व मृत्यू झाल्यानंतरही उपभोग घेतो, आपण निशुल्क पणे पुरेपूर जगण्यासाठी वापर करतो त्या निसर्ग वृक्ष संपदा संपत्ती जतन करणं ही स्वतःची व सर्व साठी काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी आपला वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला, आदर्श व अर्थबोध उपक्रमाचे अनुकरण बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी अनुकरण करणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून प्रत्येकाला ऑक्सीजन आवश्यक आहे व तो ऑक्सिजन ज्या वृक्षा पासून चोवीस तास मिळू शकतो उपलब्ध होऊ शकतो असं पिंपळाचे म्हणजेच बोधिवृक्षा रोपन केले, बोधिवृक्ष (पिंपळवृक्ष) प्रत्येकाने आपल्या वाढदिवसा निमित्त किमान पाच तरी लावावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली, त्यांच्या अनोख्या अशा वाढदिवसा निमित्त बीड-हिंगोलीचे भंते धम्माशील यांच्या हास्ते वृक्षारोपण करण्यात आले, भंते,धम्मशिल, सोबत सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम (गोटु)वीर, ज्ञानेश्वर कवठेकर, प्रशांत वासनिक, बाळु गव्हाने, प्रमोद शिंदे,धर्मराज मुजमुले, राजू जोगदंड गौतम कांबळे ॲड. अविनाश गंडले, राजेश शिंदे राजाभाऊ आठवले, डि.के.वानखेडे, शुभम ढाका आदी उपस्थित होते.

वृक्षमित्र, वृक्षप्रेमी वाढणे आवश्यक आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल, व सर्व मानवाला विनामूल्य ऑक्सीजन पुरवणारी वृक्षांची संख्या या अशा अनोख्या उपक्रमातून वाढेल असं मत भंते धम्मशिल यांनी व्यक्त केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा