शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करुन द्या –  अॅड कोल्हेंची उर्जामंत्र्यांकडे  मागणी




गेवराई । शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करुन देण्यात यावेत.जेणे करुन यापुढे विजबीलाचा बोजा कमी होवून शेतकरी सौर ऊर्जा पंपाचा उपयोग करुन त्यांची शेती विकसित करतील व शेतकऱ्यांची देखील मोघम वाढीव बिलातून सुटका होईल . तरी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करुन द्यावेत. अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड गणेश कोल्हेंनी उर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
      दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासन काही निकषांवर शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देत आहेत, गेल्या एक वर्षांपासुन देशात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव असल्याने शेतकरी पुर्ण देशो धडीला लागलेला आहे. व केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव मिळत नाही. शेतकरी हे वेळेत शेत पंपाचे बिल भरु शकलेले नाहीत. तरी मंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा उपक्रम योजने अंतर्गत सौर ऊर्जा पंप उपलब्ध करुन देण्यात यावेत . अशी मागणी अॅड गणेश कोल्हे यांनी  केली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा