शुभम धुत यांनी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची केली मदत; जेष्ठ नागरिकांचेघेतले आशीर्वाद !




युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार जेष्ट नागरिकांना युवासेनेचा आधार !

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंञी तथा युवासेना प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त शिवसेना-युवासेना च्या वतीने बीड जिल्हात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक म्हणून नगरसेवक शुभम धुत यांच्या वतीने शनिवार दि.१२ जुन रोजी कोळवाडी येथील कामधेनु आरोग्यधाम – वृद्धाश्रम व कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रम याठिकाणी अन्नधान्य व किराणा साहित्यासह मास्क, सँनिटायझर व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी च्या गोळ्या देण्यात आल्या. यानिमित्ताने युवकांची साथ व जेष्ठ नागरिकांचे आशिर्वाद मा.आदित्यजी ठाकरे साहेबांना मिळतील अशी भावना नगरसेवक शुभम धुत यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर यांच्यासह नगरसेवक शुभम धुत, सरपंच संदिपान बडगे, धनंजय वाघमारे, कामधेनु आरोग्यधाम चे श्रीनिवास कुलकर्णी, आपला परिवार वृद्धाश्रम च्या मनिषा पवार, शैलेश नाईकवाडे, डॉ.अभिजित भालेकर, शुभम कातांगळे, समीर सय्यद, अजिंक्य पवळ, वैभव जाधव, शैलेश गिरी, अभिजित आव्हाड, विशाल वाघमारे, अतिष अंधारे, राजदिप धुत, शिवम घाडगे, संकेत करवा, स्वप्नील वडमारे व इतर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा