स्वाराती रुगणालयाच्या कर्मचारी निवास व परिसराची दुरावस्था!




रुग्णालय प्रशासन कर्मचारी निवासासाठी कायम उदासिन आसल्याची कर्मचाऱ्यांना खंत !

स्वाराती प्रशासणाचे आश्वासन हवेतच विरले ?

अंबाजोगाई ।

स्वाराती रुग्णालय कर्मचारी निवासाची दुरावस्था झाली आसुन स्वरक्षक भिंतीची पडझड व घाण,गवत, काटेरी बाभुळबनाच्या विळख्यात कर्मचारी निवासस्थान सापडले आहेत.दुरुस्ती बाबद स्वाराती प्रशासणाला कर्मचाऱ्यानी दिलेले निवेदन व निवेदनाद्वारे मिळालेले प्रशासणाचे आश्वासन मात्र हावेतच विरल्याचे पाहिला मिळत आसुन कर्मचारी कुटूंबांना हाकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
स्वाराती रुग्णालय व कर्मचारी निवासस्थानाला आनेक समस्यानी घेरले होते.तत्तकालीन अधिष्ठाता सुधीर देशमुख यांच्या केवळ दुर्लक्षीतपणामुळे दुरावस्था झाल्याचा कर्मचाऱ्यांत नाराजीचा सुर ऐैकायला मिळत होता.देशमुख यांच्या जागी अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांची नियुक्ती झाली. त्यांनी रुग्णालय परिसरातील समस्याचा विळखा पाहूण हाळूहाळू समस्याचा विळखा सोडवत रुग्णालयाचा चेहरामोहरा बध्दलुन स्वारातीचे रुपडे पालटले. ऑक्सिजन प्लॉट, नवनविण यंत्रसामुग्री, नवीण वार्डाची निर्मीती केली.कोवीडच्या हाहाकारात स्वाराती रुग्णालय रुग्णांना दिलासा देण्याचे काम केल्यामुळे राज्यातून रुग्णांचे लोंढे या रुग्णालयात कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत होते.त्यात डॉक्टर बरोबर दिवसरात्र डोळ्यात तेल घालून कर्मचारी कोवीड वार्डात कर्तव्य बजावत होते.यात आनेक कर्मचाऱ्यानां कोरोनाची लागण झाली होती तर कांहीना जिव गमवावा लागला होता.कोरोनाची लागण झालेले कर्मचारी कोरोना मुक्त झाल्या नंतर पुन्हा कर्तव्यावर हाजर होऊन रुग्णांवर उपचार करत आहेते.
स्वारातीच्या चेहरामोहरा बद्धलनारे प्रशासण मात्र खरे कोरोना योद्धा असणारे कर्मचारी राहात आसलेल्या निवासाच्या बाबतीत भौतीक सुविधा देण्यास मात्र कायम उदासिन आसल्याच पाहिला मिळत आहे.निवासाच्या भिंती,खिडकीवर मोठे मोठे वृक्ष फोफावले आहेत. तर पावसाळ्याच्या दिवसात कांही निवासाच्या छताला गळती लागत आहे. निवासाच्या आजुबाजाला घाण गवत व काठेरी झाड झुडूप वाढले आहेत.घाण गवत काट्या कुपाट्यात आनेक वेळा साप,विंचू, उंदीराचा वावर वाढल्या मुळे कर्मचारी कुटुंब भयभित झाले आहेत.दुर्गंधीयुक्त परिसर बनल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबा आरोग्याला ही धोका निर्माण झाला आसुन रोगराईचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे.स्वरक्ष भिंतीची दुरावस्था व ठिकठीकाणी भिंतीची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याने भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे.निवासाच्या मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वाराला गेट नसल्यामुळे बाहेरचे कोणीही बिनधास्तपणे आत्त ये जा करत आसल्याने आवो जावो घर तुम्हारा आशी स्थिती निवासाची बनली आहे.पिण्याच्या पाण्याची ही स्थिती ही गंभीर बनली आसुन लाईटची सततच्या लपंडावामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. स्वाराती रुग्णालयाचा चेहरामोहरा बध्दलनाऱ्या प्रशासणाला आनेक वेळा लेखी तोंडी निवेदन देऊनही स्वाराती प्रशासण केवळ गांभीर्यने घेत नसल्यमुळे कर्मचारी निवास खंडर बनत चालले आहे.कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रशासणाकडे वेळो वेळी लेखी निवेदनाद्वारे निवासस्थान व स्वरक्षक भिंतीची दुरुस्ती करुण परिसरातील घाण गवत, काठेरी झुडूपांचा नायनाट करूण दुर्गंधीयुक्त परिसराची साफसफाई करावी. मुख्य रस्त्याला गेट बसवून गार्डची कायमस्वरूपी नियुक्ती करावी.वेळेवर पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा करण्यात यावा.परिसरात सिसिटीव्ही बसवण्यात याव्यात. रात्री आपरात्री महिला कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी ये जा करावी लागती त्यामुळे खांबावर चांगल्या दर्जाचे लख्ख प्रकाशाचे बल्ब बसवावे. प्रशासणाने निवासस्थान व परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचारी निवास भयमुक्त करूण भौतीक सुख सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे स्वाराती प्रशासणाकडे करण्यात आली आसुन रुग्णालय परिसराचा चेहरामोहरा बध्दलारे अधिष्ठाता डॉ शिवाजी शुक्रे हे कर्मचारी कुटूंबाना भयमुक्त करुण निवासाचा चेहरामोहरा कधी बाध्दलनारे या कडे कर्मचारी बंधू भगिनीचे लक्ष लागले आहेत.

स्वाराती प्रशासणाचे आश्वासन हवेतच विरले

स्वाराती प्रशासणाला निवेदनाद्वारे केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने दखल घेऊन निवास,संरक्षण भिंत,सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षारक्षकांची नेमणूकी, घाण गवत काठेरी बाभुळबन व दुर्गंधीयुक्त परिसराची साफसफाई व भयमुक्त व दुर्गंधीमुक्त परिसर करण्याचे आश्वासन प्रशासणाने दिले होते.त्यापैकी केवळ खांबावरच्या बल्बची पुर्तता करुण भौतीक सुविधा मात्र हवेतच विरल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा