आजीबाईचा बटवा हरवला !




आजीबाईचा बटवा हरवला !
महागाईच्या कचाट्यात गरिबांचे जगणे !

आजार हेच मोठे दुखणे आहे , आरोग्याची अपेक्षा कुणाला नसते म्हणूनच पोटाला चिमटे घेऊन आणि भाव न करता खरेदी करून दवा घेणारे आम्ही सर्व मान डोलावत डोलावत डॉक्टरांचा सल्ला ऐकत ऐकत त्यांचा गल्ला भरत असतो . मुळात त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही , वर्तमान उपचार पद्धती आणि त्यासाठी उपलब्ध असलेली मशनरी लक्षात घेता कोट्यावधी गुंतवून कुठलाही व्यवहार किमान नफा कमावताना रुग्णात ग्राहक शोधलच . म्हणूनच दवाखाना आता स्वस्तात राहिला नाही , कोरोनाच्या काळात तर दवाखाना लाखाच्या खाली आलाच नाही , साधे आजार देखील पाचशेची नोट मागतात , निमताळी पिढी झाली आणि ठेच लागली आणि शंभराची नोट गेली असाच हा काळ आहे , कुऱ्हाडीचा पाला पिळून जखमा भरणे समाज विसरला आहे कारण आजीबाईचा बटवा हरवला आहे .
प्रौढ झालेल्या पिढीच्या बालपणात दवाखाना क्वचित असायचा , सलाईन लावली म्हणजे कायच मोठा आजार असा समज असणारा समाज होता , आज मात्र चलता चलता विकटोफॉल लावावी लागते , पूर्वी दवाखान्याच्या अलीकडे अनेक इलाज घरच्या घरी असायचे आता , सगळ्याच दुखण्याला एकच डॉक्टर असायचा आता मात्र आजारनिहाय डॉक्टर आणि दवाखाने आहेत , प्रगती ,संशोधन ,शोध झाल्याने तपासणी व उपचार अधिक वस्तूनिष्ठ झालाच आहे यावर दुमत नाही , मात्र वर्तमान पिढी निमताळी निघाली आणि शरीरालाच दवाखाना बनवले गेले , आज दवाखान्याशिवाय जन्म नाही आणि दवाखाना नाही असा महिना नाही , नैसर्गिक बाळंतपण एक आकडी टक्क्यात तर सर्रास सीजर चालू झाले आहेत . आम्ही नैसर्गिक उपचार आणि शरीराची प्रतिकार शक्तीच नाकारली . ज्यामुळे सुमार आजारासमोर जीवन शरणागती मानत आहेत . सध्या आैषधी दुकानांवर जाऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनेक जण किरकोळ कारणासाठी काेणतेही औषध मागून घेतात. अशावेळी ही औषध घेऊन दुकणे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.पण अनेकदा, नेहमी घेण्यात येणाऱ्या अशा औषधमुळे शरिरात साईडईफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे किरकोळ औषध घेण्यापेक्षा हे उपाय केंव्हाही चांगलेच. तुळशीचा पाल्याचा काढा
चार तुळशीची पाने, तीन लवंगा, दाेन वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, चार कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या.फुटाणे खा कारण खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. कांद्याचं पाणी देखील किती लाभदायक आहे हे वर्तमान पिढीला माहित नसावे , लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा तीन कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबाद्वारे बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.दूध आणि हळद काय काम करू शकते यासाठी गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हळद अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरिअल असते. जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.आल्याचा चहा सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. लिंबू आणि मध यांचा देखील फायदा होतो . दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावे, खूप फायदा होतो.

हे वाचा –

तक्रार :- ताप येणे
आयुर्वेदीय :- त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- फेरम फॉस काली मूर अ‍ॅकोनाईट
अ‍ॅलोपॅथी :- क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय :- कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

तक्रार :- सर्दी
आयुर्वेदीय :- त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- फेरम फॉस, नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-बेनेड्रिल
घरगुती उपाय :-आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

तक्रार :- खोकला
आयुर्वेदीय :-अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :- ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय :- लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

तक्रार :- जुलाब
आयुर्वेदीय :- संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी :- सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :- सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. तक्रार :- *आव (रक्त पडत नसेल तर)*
आयुर्वेदीय :-संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी :- मेट्रोजिल
घरगुती उपाय :- मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

तक्रार :- उलट्या
आयुर्वेदीय :- प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :- स्टेमेटिल
घरगुती उपाय :- मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

तक्रार :- तोंड येणे
आयुर्वेदीय :- कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
अ‍ॅलोपॅथी :- ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :- जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन
आयुर्वेदीय :- प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अ‍ॅलोपॅथी :- झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
घरगुती उपाय :- भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

तक्रार :- जंत कृमि
आयुर्वेदीय :- कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- सीना
अ‍ॅलोपॅथी :- हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

तक्रार :- सांधे दुखी
आयुर्वेदीय :- सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- ब्रुफेन
घरगुती उपाय :- सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

तक्रार :- *मूत्र विकार*
आयुर्वेदीय :- चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :- अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :- धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )
आयुर्वेदीय :-कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :- क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय :- लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )
आयुर्वेदीय :- ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- काली फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :- काम्पोज
घरगुती उपाय :- वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी
आयुर्वेदीय :- सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- हिपार सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय :- अमसुलाचे पाणी

तक्रार :- भाजणे, पोळणे
आयुर्वेदीय :- शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- कन्येरिस मलम
अ‍ॅलोपॅथी :- बर्नाल
घरगुती उपाय :- तूप लावणे

तक्रार :- मुरगळणे लचकणे
आयुर्वेदीय :- लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- अर्निका मलम पोटात अर्निका
अ‍ॅलोपॅथी :- आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय :- रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

तक्रार :- जखमा
आयुर्वेदीय :-शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अ‍ॅलोपॅथी :-बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय :-स्वच्छ खोबरेल तेल

तक्रार :- दातदुखी
आयुर्वेदीय :- लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अ‍ॅलोपॅथी :- लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :- तुपाचा बोळा

तक्रार :- कानदुखी
आयुर्वेदीय :- सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- काली सल्फ नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :- वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-लसणीचे तेल कानात घालणे

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )
आयुर्वेदीय :-आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन सारिवाद्यासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-कल्केरिआ फॉस नेट्रम सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- .
घरगुती उपाय :- हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी

भागवतजी तावरे 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा