झाडांना आपले मित्र समजून त्यांचे संगोपन करा- डॉ. योगेश क्षीरसागर




युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न।

बीड ।
शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा नेते तथा न.प.सदस्य डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचे सहकारी शुभम कातांगळे यांनी लॉ कॉलेज परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते

याप्रसंगी बोलताना डॉ.योगेश भैय्यांनी हा उपक्रम सध्याच्या काळात गरजेचा असुन स्वच्छ हवा तर आपल्याला या झाडांच्या माध्यमातून मिळेलच परंतु यामुळे या परिसराचे सौंदर्य अधिक खुलुन दिसेल येथील वातावरणात प्रसन्नता निर्माण होईल व उन्हाळ्यात हे झाड आपल्याला सावली देईल,असे अनेक फायदे आहेत. झाडं हे आपले मिञ आहेत असे समजुन आपण त्यांचे संगोपन केले पाहिजे, हाच उदात्त हेतु घेऊन पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्यसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.बीड शहरात काही वर्षांपूर्वी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनातून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली ती आज शहराचे सौंदर्य खुलवत आहेत.

हा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, व नगरसेवक शुभम धुत यांच्या मागर्दर्शनखाली घेण्यात आला या प्रसंगी गजानन बँकेचे संचालक धनंजय वाघमारे, शैलेश नाईकवाडे, अजिंक्य पवळ, आकाश शिंघन ,विशाल शिंदे ,श्रीनाथ रसाळ , विशाल वाघमारे , अभिजित आव्हाड, सागर वाव्हुळ, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा