ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती द्या ! – मराठा क्रांती मोर्चा




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी  !

बीड l  मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर समाजात प्रंचड असंतोष आहे यानंतर प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार हे बीड दौऱ्यावर आले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन समाजाच्या मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, 9 सप्टेंबर 2020च्या आगोदर ज्यांच्या नौकर्यात नेमणुका झाल्या आहेत त्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात. सारथी साठी भरीव निधी द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील मुला- मुली साठी वस्तिगृह उभारावे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला  भरीव निधी देवुन कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंचवीस लाख करावी . जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती द्याव्यात.  यामागण्याचे निवेदन देण्यात आले.

वरील मागण्या ह्या योग्य असुन काही दिवसातच या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे स्पष्ट आश्वासन अजितदादांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे पालकमंत्री धनंजय मुंडे आ. संदिप क्षीरसागर, क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक हिंगे, गंगाधर काळकुटे, सुनील सुरवसे , सचिन उबाळे , महेश धांडे , विजय लव्हाळे , विठ्ठल बहीर , संतोष जाधव , अॅड.शशिकांत सावंत, मळीराम यादव, शैलेश जाधव, राहुल टेकाळे, अशोक सुखवसे, जयमल्हार बागल, रवी शिंदे ,प्रा गोपाळ धांडे ,संदीप उबाळे, भागवत मस्के ,बालाजी पवार, श्रीकांत बागलाने, रोहन काळे आदि उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा