गजानन विद्यालयाचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश !




नवगण राजुरी दि.१८(प्रतिनिधी):- येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु.भोसले भारती हि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत सोळावी रँक मिळून जिल्ह्यात दुसरी आली. तर जमदाडे ओमकारने १९६ वी रँक प्राप्त केली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एन. टी .एस) परीक्षेत गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर , नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राजू मचाले, कार्यवाह राऊत एम .ए, शाळेचे मुख्याध्यापक केशव भांगे, उपमुख्याध्यापक शिंदे एस.एस , पर्यवेक्षक शिंदे आर .आर सर्व कर्मचारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा