खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील युरीया खताचा प्रश्न सोडवला




अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन बीडसाठी 1200 मे.टन युरीया उपलब्ध
बीड ।
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामात युरीया खताची टंचाई भासुनये यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कृषी आयुक्त पुणे यांना पत्र लिहुन अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बीड जिल्ह्यातील तालुक्यासाठी खत उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या होत्या.यानुसार नगर रेल्वे ट्रॅकवरुन बीड जिल्ह्यासाठी 1200 मेट्रीक टन खत उपलब्ध झाल्याने शेतकर्यांना खरीप हंगामासाठी मुबलक युरीया उपलब्ध झाला आहे.युरीयाचा प्रश्न सोडविल्याबद्दल शेतकरी वर्गातून खा.डॉ.प्रितमताईंचे आभार मानले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी रेल्वेने खताची आयात होते.जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे एकमेव रेल्वे ट्रॅक असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या आष्टी,गेवराई,शिरुर कासार,पाटोदा या तालुक्यातील कृषी विक्रेत्यासाठी अडचणीचे ठरत होते.खताच्या अनेक कंपन्यांनी नगर रेल्वेपॉईंटवरुन बीड जिल्ह्यातील पश्चिम भागातील शेतकर्यांसाठी खत पुरवठ्यास मान्यता दिली होती परंतु या प्रक्रियेत अडथळा येत असल्याने वरील तालुक्यातील खत विक्रेते व शेतकर्यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याकडे युरीया खताचा हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.सध्या शेतकर्यांचा खरीप हंगाम सुरु असुन जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याने युरीया खताची मागणी अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात घेवुन जिल्ह्याच्या दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कृषी आयुक्त धिरज कुमार यांना पत्र लिहुन अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन बीड जिल्ह्यासाठी खत उपलब्ध होण्यासंदर्भातील अडथळे दुर करुन युरीयाचा अतिरिक्त साठा उपलब्ध करावा असे कळविल्यानंतर बीड जिल्ह्याच्या युरीया पुरवठ्यातील अडथळे दुर होवुन 1200 मेट्रीक टन युरीया उपलब्ध झाला आहे.यामुळे आष्टी,गेवराई,शिरुर कासार,पाटोदा आदी तालुक्यातील शेतकर्यांच्या खताचा प्रश्न मिटला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा