ढेकणमोहा येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ‌बियाणे वाटप




ढेकणमोहा येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ‌बियाणे वाटप

बीड । तालुक्यातील ढेकनमोहा येथे कृषी विभाग बीड यांच्याकडून ढेकनमोहा येथील शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी जोगदंड आर. यु. मंडळ कुषी आधिकारी, खामकर डी.डी. कृषी पर्यवेक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ढेकणमोहा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री खामकर यांनी दहा टक्के खत बचत व बीज प्रक्रिया, पोकरा विषयी सविस्तर माहिती दिली. मग्रारोहयो फळबाग लागवड व सोयाबीन बी बी एफ (रुंद वरंबा सरी पद्धत) विषयी जोगदंड साहेब ‌यानी मार्गदर्शन केले. या निमित्त शेतकरी रमाई गटास बाजरी बियाणे वाटप करण्यात आले व बाजरी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी जोगदंड साहेब, कृषी पर्यवेक्षक खामकर साहेब, रेवती धिवार, माजी सरपंच नागेश शिंदे, नारायण देवकते (चेअरमन ढेकनमोहा), भास्कर देवकते, हरीश खाडे, पत्रकार विनोद शिंदे, लखन कानडे, अनिल कानडे, भगवान शिंदे, रामेश्वर शिंदे, सुदाम शिंदे, कचराप्पा शिंदे, रोहित कानडे, राजेंद्र साळवे, ज्ञानेश्वर शिंदे, शुभांगी शिंदे, गंगुबाई शिंदे, कमलबाई शिंदे, सुमन शिंदे, मंगल शिंदे, विमल शिंदे, सुरेखा शिंदे यांच्यासह यावेळी कार्यक्रमासाठी शेतकरी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा