महाबळेश्वरच्या गुहेत वटवागुळीला कुणी कवटाळले ?

Cave nectar bat (Eonycteris spelaea) from Singapore.



                  डेल्टाची पैदाईश कुणाची !
     महाबळेश्वरच्या गुहेत वटवागुळीला कुणी कवटाळले ?

तुम्हाला आठवते का म्युकरमाईसेस झाला कि ९० इंजेक्शन लागतील , डोळे काढावे लागतील अशी चर्चा होती , इंजेक्शन ची किमत ऐकूनच गाळण उडावी , म्हणे ज्यांना ज्यांना कोरोना होऊन गेला त्यांना धोका आहे , किती खरे अन किती खोटे मात्र म्युकर चे भूत चढत नाही तोच डेल्टा आला , बर हा फक्त केरळ आणि महाराष्ट्रात आला म्हणे , बर झाल त्याला महाराष्ट्रच आवडला , हे कमी होत म्हणून निपाह नावाचा विषाणू सापडला अन तो कुठे आहे तर म्हणे महाबळेश्वरच्या गुहेत , आमच्या वृत्त वाहिन्याने दिवस भर गुहेतच काढला , वटवागुळ उकळून पिल्यावर कुठल्या शहाण्याने निष्पन्न केले कि विषाणू आहे , बर गुहेत आहे हा शोध कुठल्या महात्म्याने लावला , कोण गृहस्थ वटवागुळीला कवटाळायला गेले , काही माहित नाही , टीव्ही वाले तर लगेच भेसूर कोरस देऊन विषाणूचे बाळसे घालतात आणि असे अंगाई गातात कि माणसाला निवेदक साक्षात यमच भासावा . बर हे कुणाला माहित आहे गुलीयन बेरी सिंड्रोम नावाचा व्हायरस इंग्लंड आणि भारतात सापडला आहे , आणि तो लस घेनारास होतो . कुणाचा कुणाला मेळ नाही एक डॉक्टर म्हणतो तिसरी लाट येणार, एक म्हणतो नाही . सरकार ने तर ५० लाख रुग्ण तिसरीत होतील असे म्हटले . दुसऱ्या लाटेत लोक दगावली मात्र त्यात भीतीने किती , नैसर्गिक मृत्यूने किती , चुकीच्या उपचाराने किती असे रकाने केली का तर नाही .
डेल्टा नावाच गारुड महाराष्ट्राच्या दारात आहे कुठल्या शहाण्याने हा डेल्टा प्लस आणला , बर हा डेल्टा आला तर याची औषधे कुठली आहेत तर कुठलीच नाही , मग यात वेगळे काय आहे . बर याची वेगळी वैक्सीन आहे का मग या वैक्सीन घेऊ नका म्हणणार आहात , लोकांना घाबरवून आणखी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी केली जात आहे , डेल्टा वन ला इंडियन व्हायरस असे जगात म्हटले जात आहे . तिसऱ्या लाटेच्या धसक्याने सरकार आणि यंत्रणा अत्यंत दक्ष झाली आहे , उठसुठ लॉकडाऊन लावत व्यापारधंद्यावर अधिकाधिक निर्बंध लावणे हे महाविकास आघाडी सरकारचं मोठंच अपयश आहे. महाराष्ट्रातील लोक आता कोरोना सोबत भूक आणि मानसिक आजारांनी मरु लागतील. एकंदरीत महाराष्ट्र सरकार बाबू लोकांच्या सल्ल्याने एकांगी आणि अर्थव्यवस्थेचा विचार न करता लॉकडाऊन लादत चाललंय.कोरोना-निर्बंध यावर देखील घेतलेले निर्णय दिवसाघडीला बदलत असतात. राज्यातील बेरोजगारी,महागाई,आरक्षण(नव्याने उपस्थित) यांसारख्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्याची सरकारची मानासिकता सध्यातरी दिसत नाही.नेत्यांचे राजकीय दौरे,सभा,मोर्चे,निवडणूका सोडून इतर सर्व ठिकाणी कोरोनाचा धोका आहे.
, लॉक डाऊन हा शेवटचा पर्याय समजला जात असला तरी आमच्याकडे दुसरे शस्त्रच नसल्याने पहिल्याच प्रहरी आम्ही ते ब्रम्हास्त्र वापरतो . कोरोनाच्या तीन लाटेत म्हणजे तिसरी अजून यायची आहे मात्र पहिल्या म्हणजे भोगून झालेल्या दोन लाटेत मुलभूत दोन फरक आहेत , पहिल्या लाटेत लोक व यंत्रणा हातात हात घालून होते त्यामुळे अनाकलनीय कोरोना देखील समजून घेताना लोकांनी मोठ सहकार्य केले . मात्र दुसऱ्या लाटेत सरकारने लोकघृणा केली , लोकांच्या सोर्स व जगण्याचा कुठलाही कार्यक्रम दिला नाही झोपेत धोंडा घातल्या प्रमाणे निर्बंदाची झडी उडवली . सामान्य लोकांना वेगळा आणि नेत्यांना वेगळा नियम लावून दुसऱ्या लाटेत लोक चुकावेत अशीच स्थिती नेत्यांनी केली , मग मोदींच्या बंगाली सभा असो वा धाकल्या पवारांच्या पंढरपुरातल्या सभा , लोकांना विश्वास बसू नये असेच ते चित्र असल्याने नको व्हायला तो घाटा झाला आणि लोक केवळ भीती गैरसमज आणि वेळेवर न मिळालेला उपचार , चुकीचा उपचाराने रुग्ण दगावली , कोरोना पेक्षा रुग्ण हलगर्जीने गेली , असो विषय आजचा वेगळा आहे .
कोरोनाची तिसरी लाट येते येते म्हणत असताना डेल्टा नावाचा व्हायरस आला पण , बर कुठून आला त्याचे नामंकरण कुणी केले , त्याचा जन्म कुठून कसा झाला , त्याचा जन्मदाता म्हणजे बाप कोण काही माहित नाही , वैज्ञानिक इतिहासात असले रोग या पूर्वी कधी का नाही आले , बर लोकांनी चार ला दुकाने बंद करायची मात्र अजित पवारांनी मात्र हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीची कार्यलये उघडायची , बर लोकांनी आपल्या जगण्यासाठी गर्दी केली कि बघा बघा किती लापरवाही म्हणारे फेसबुक ज्ञानी आणि माध्यम मेटेंचा मोर्चा झंझावात समजतात , महाराष्ट्रातले मोर्चे आजचा चक्का जाम कोरोना वाढवत नाहीत फक्त गरिबांचे चहाचे ठेले , दुकाने कोरोना वाढवतात , लोक बोळ्याने धुध पित असल्या सारखे निर्बंद केवळ गरिबांच्या माथी कसे असतात , आ विनायक मेटेंचा मोर्चा निघाला जे प्रशासन मास्क नसला कि २०० मोजून घेतात तेच प्रशासन ३००० लोक बिगर मास्क चे होते त्यांना संरक्षण देत नव्हते काय , उद्या आ धसांचा मोर्चा निघेल तिथे निर्बंध कुठे जातील , आज भाजपचा चक्का जाम आहे इथेही लोक समोर येतील तिथे मात्र आरक्षण आंदोलनात नेत्यांच्या दुकाना चालाव्यात म्हणून निर्बंध पायदळी तुडवले जातात , मिडीया सुधा गर्दीचे कौतुक करते , तीच मिडिया सामान्य माणसाच्या गर्दीवर नाक मुरडते , गरिबांच्या दुकाना बंद करताना राजकीय दुकानदार मात्र मस्त मोर्चे काढून स्वतचे राजकारण साधतात.
लोकांना हे सांगितले पाहिजे कि घाबरू नका , कारण घाबरणे हाच व्हायरस ला मदत करतो , अमेरिकेने मास्क काढला तिकडे कुणी मास्क वापरत नाही , फायझर आणि मोडर्ना या लस देशाने घ्यावेत अन मुलांना द्याव्यात , मुलांना कोरोना होणार नाही , मात्र देश असे का करत नाही . सप्लाय साठी मरमर करणारे सरकार व्हैक्सीन वर जोर का देत नाहीत .
सरकार निव्वळ मास्क वरून लोकांना शिव्या देत आहे , डिसेंबर २०२० ला भारतात केवळ ७ टक्के लोक मास्क घालत होते मग तरीही कोरोना गेलाच ना , मग केवळ मास्क मुळे कोरोना येतो जातो हे सरकारने कसे ठरवले . याचा अर्थ लोक हलगर्जी करतात म्हणून मिडीया आणि सरकार जी लोकघृणा करते ना तीच मुळात साफ चुकीची आहे . ठाकरे सरकार ने बाकीचे सगळे सोडून दिले आणि लावा निर्बंद . हे मात्र निव्वळ अंधश्रद्धा आहे . लोकांचे जगणे वेठीस धरून जीवन वाचवणे म्हणजे विष पी आणि अमर हो प्रमाणे आहे .

लोकपत्रकार भागवत तावरे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा