जम्मू विमानतळावर मोठा स्फोट




 

नवी दिल्ली : जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आहे. रविवारी सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली की, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असल्याले भागात झालेला आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाहणी करत आहे.

स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा पहाटे २ वाजता हा स्फोट झाला आहे. स्फोटामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस सध्या हवाई दलाकडून प्राथमिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा