नेकनूर परिसरातील जनतेने लस घेण्यासाठी -भारतीय मराठा महासंघाची जनजागृती मोहीम




नेकनूर परिसरातील जनतेला लस घेण्यासाठी  भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जनजागृती

बीड ।तिसरी लाट भारतात डेल्टा प्लस या नावाने डोके वर काढत असताना, या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी एकमेव असा उपलब्ध असलेला उपाय म्हणजे जास्तीत जास्त वेगाने लसीकरण होय. आणि या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात जनजागृती करण्यासाठी नेकनूर परिसरातील भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
या जनजागृती मोहिमेत भारतीय मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, तालुका संपर्क प्रमुख संकेत ढेरे, बालाघाट प्रमुख सौरभ चव्हाण, बालाघाट युवा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नेकनुर सर्कल प्रमुख सारंग काळे, नेकनुर कोषाध्यक्ष अंकुश मेंगडे, नेकनुर शहराध्यक्ष आकाश यादव आणि आमचे मार्गदर्शक मंगेश डोंगरे सर घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.
नेकनूर स्त्री कुटीर रुग्णालयात काही दिवसापूर्वी करोना चाचणी rt-pcr, ऑंटी जन टेस्ट केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील जनतेची होणारी ताणाताण आता नक्कीच कमी होईल. तसेच अठरा वर्षापुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले असल्याने प्रशासनाने मान्यता दिलेल्या लसी बद्दल कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळून लस घ्यावी असे. आवाहन भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. लसघेण्या साठी नोंदणी करण्यासाठी आपले नाव NEEDLY APP किवा EZZ APP या ॲप वर नोंदवावे व या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने तसेच वैद्यकीय अधीक्षक स्त्री कुटीर रुग्णालय नेकनूर डॉक्टर शिंदे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा